हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेले तीन ते चार दिवस अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Weather Update) पाहायला मिळाला. ज्यामुळे काही भागांमध्ये फळ पिकांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. अशातच आता आजपासून राज्यात सर्वत्र कोरडे हवामान राहणार असून, पावसाचे वातावरण पूर्णतः निवळणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. याशिवाय पुढील 4 ते 5 दिवस राज्यात उष्णतेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून, सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
अहमदनगरमध्ये उच्चांकी तापमान (Weather Update Today 1 April 2024)
मागील 24 तासांमध्ये राज्यात अवकाळी पावसाच्या वातावरणानंतर, कमाल तापमानात (Weather Update) काहीशी घट नोंदवली गेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये 42.5 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. त्यातच हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ज्यामुळे राज्यातील उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच पुन्हा एकदा 7 तारखेनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.
या भागांमध्ये आज पावसाची शक्यता
दरम्यान, सध्या घडीला हिमालयीन भाग वगळता आणि दक्षिणेकडील राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील (Weather Update) भाग वगळता देशात अन्य कोणत्याही भागामध्ये पावसाचे वातावरण नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये देशात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील आसाम आणि मेघालय या राज्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. याउलट मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झालेल्या मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाडा, उत्तर कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य भारतासह पूर्व किनारपट्टीवरील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.