Success Story : ऊस कपाशीला, तूर भारी; शेतकऱ्यांना मिळतीये एकरात लाखाची कमाई!

Success Story Of Tur Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करत, मोठ्या प्रमाणात उत्पन्न (Success Story) घेत आहे. गोदावरीच्या काठाजवळ वसलेले शंकरपूर (ता. गंगापूर) हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पारंपरिक ऊस पिकाचा पट्टा असलेले गाव आहे. मात्र, या गावातील मिश्र पीक पद्धतीतून ऊस पिकाला फाटा देत कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळविण्यात अभंग शेवाळे यांनी आपला वेगळेपणा निर्माण केला आहे. ज्यातून परिसरातील अनेक शेतकरी शेवाळे यांच्याकडून मार्गदर्शन (Success Story) घेत आहे.

शिक्षणानंतर नोकरीला फाटा (Success Story Of Tur Farming)

शेवाळे यांचे पदवीचे शिक्षण झाले असून, आणि त्यांनी नोकरीच्या वाट न धरता (Success Story) थेट वडीलोपार्जित १२० एकर शेताकडे धाव घेतली. कमीत-कमी रासायनिक व अधिकाअधिक जैविक शेती करण्याकडे कळ असल्याने त्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता मिश्र पीक पद्धतीतून पीक घेण्याचे ठरवले. यातून गेल्या सहा वर्षांपासून पारंपरिक ऊसाच्या शेतात शेवाळे तूर, कापूस, सोयाबीन, मोसंबी, आले, चिकू, आंबा, असे पिके घेत आहे. तसेच ही पिके घेतांना सतत पीक पद्धतीत बदल करण्यापासून ते नवनवीन प्रयोग करत आहेत.

उत्पादनासाठी सुयोग्य नियोजन

सहा वर्षांपासून ही सर्व पिके घेतांना त्यांना तूर या पिकाने चांगली साथ दिल्याचे ते सांगतात. चांगले कुजलेले शेणखत, हिरवळीचे खते, तसेच पिकातील आपला वाटा घेत इतर अवशेष जमिनीत एकजीव करत ते मातीचे व्यवस्थापन करतात. ज्यामुळे त्यांना अधिकचे उत्पादन मिळते. तसेच तूर पिकाचे नियोजन करताना बियाणे खरेदीपासून लागवडीचे अंतर, खत व्यवस्थापन, कीड संरक्षण ते वेळोवेळी तज्ज्ञांचा तांत्रिक सल्ला घेत असल्याचे ते सांगतात.

तूर व्यवस्थापन व लागवड

शेतकरी अभंग शेवाळे यांनी टोकन पद्धतीने दोन ते तीन दाणे टाकत, दोन ओळीतील अंतर ७ फुट तर दोन झाडांतील अंतर १.५ फूट राखत यावर्षी ‘गोदावरी’ या जातीच्या तुरीची लागवड केली होती. तर खत व्यवस्थापनात एक बॅग डीएपी, फळधारणेच्या वेळी सुष्म अन्नद्रवांची फवारणी व किटकांच्या नियंत्रणासाठी कीटक सापळे तर काही अंशी रासायनिक किटकनाशकांचा वापर केला होता. ठिबकचा वापर असलेल्या या तुरींची लागवडीनंतर ३५-६५-८० व्या दिवशी शेंडा खुडणी केली असल्याचे ही ते सांगतात. खुडणी केल्याने फवारणीचा अधिक फायदा होऊन, कीटकांवर नियंत्रण मिळविता येते. तसेच झाडांना योग्य सूर्यप्रकाश मिळतो.

तूरीच्या उत्पन्नाला मकाचा आधार

साधारण जानेवारी मध्ये तूर काढल्यानंतर त्या शेतात मका लागवड (Success Story) केली जाते. तुरीचे अवशेष नष्ट केल्याने त्यातून निर्माण झालेला अधिकचा नत्र पोषक ठरत असल्याने यातून मका चांगली बहरते. एकरी ३५ क्विंटलपर्यंत शेवाळे मकाचे उत्पादन घेतात. तर खर्च वजा जाता निव्वळ नफा म्हणून पन्नास हजारांचे तुरीला आधार असलेले उत्पन्न मका पिकातून त्यांना मिळतात. यंदा मशागत, बियाणे, लागवड, खते, व्यवस्थापन, काढणी आदींसाठी सरासरी एकरी वीस हजारांचा खर्च तुरींवर झाला. तर एकरी १० क्विंटलचे उत्पादन मिळाले. यावर्षी तुरींना अकरा हजारांचा दर मिळाला असून खर्च वजा जाता ऊसा पेक्षा कमी कलावधीत अधिक उत्पन्न ऐंशी हजार मिळाले असल्याचे अभंग शेवाळे सांगतात.