Soybean Market Rate: नागपूर बाजार समितीत सोयाबीनला 12,500 रूपये भाव! जाणून घ्या इतर बाजारातील हाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील महिन्या भरापासून सोयाबीनचे दर (Soybean Market Rate) स्थिर असून शेतकर्‍यांना हमीभावही (MSP) मिळत नसल्याचे चित्र आहे. भाववाढ (Price Rise) होईल या आशेने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची (Soybean) साठवणूक करून ठेवलेली आहे.

दरम्यान, आज नागपूर बाजार समितीत (Nagpur Bajar Samiti) सोयाबीनला प्रति क्विंटल 12,500 रूपयांचा भाव मिळाला आहे. इतर बाजार समितीपेक्षा हा मिळालेला भाव जास्त आहे. उर्वरित बाजार समितीत प्रति क्विंटल 4300 ते 4500 रूपये भाव (Soybean Market Rate) मिळत आहे.

आज लातूर बाजार समितीत (Latur Bajar Samiti) 2950 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे मिळालेला दर हा कमीतकमी 4350 रुपये एवढा होता. तर सर्वसाधारण 4562 एवढा भाव सोयाबीनला (Soybean Market Rate) आज मिळाला.

धाराशिव जिल्हा बाजार समितीत (Dharashiv Bajar Samiti) आज 1000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण 4450 रुपये क्विंटलमागे दर मिळाला. मागील चार दिवसांपासून धाराशिवमध्ये सोयाबीनच्या भावात फारसा बदल झालेला नाही.

अमरावती जिल्हा बाजार समितीत (Amravati Bajar Samiti) आज 4638 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण 4395 रुपये क्विंटलमागे दर मिळाला. कमीत कमी दर 4350 रुपये तर जास्तीत जास्त 4440 रुपये दर मिळाला आहे.

हिंगोली जिल्हा बाजार समितीत (Hingoli Bajar Samiti) आज 1000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण 4350 रुपये क्विंटलमागे दर मिळाला. कमीत कमी दर 4150 रुपये तर जास्तीत जास्त 4551 रुपये दर (Soybean Market Rate) मिळाला आहे.