हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग (Success Story) होत आहेत. तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. शेती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील यश मिळवताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी फळे आणि भाजीपाला पिकातून स्वत:ची आर्थिक प्रगती साधलीय. निलीमा असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने शेडनेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. या फळे आणि भाजीपाला पिकांच्या माध्यमातून त्या मोठा आर्थिक नफा (Success Story) मिळवत आहेत.
कोणत्या पिकांची लागवड? (Success Story Women Farmer)
निलीमा देवी या बिहारमधील बांका जिल्ह्यातील पोखरिया गावातील (Success Story) रहिवासी आहेत. त्यांनी शेडनेडचा वापर करून फळे आणि भाजीपाला लागवड केली आहे. यातून त्या चांगला नफा मिळवत आहेत. याचबरोबर निलीमा या आपल्या शेडनेट तंत्राद्वारे रोपवाटीका देखील तयार करत आहेत. यातूनही त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. अर्थात रोपे विक्रीतूनही त्यांना चांगली कमाई होते. याव्यतिरिक्त त्या प्रामुख्याने आपल्या शेतीमध्ये मिरची, कोबी, फ्लॉवर, भेंडी, कारले या भाजीपाला पिकांची बाजाराचा अंदाज आणि मागणीनुसार लागवड करतात. ज्यामुळे त्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होत असल्याचे त्या सांगतात.
फळे, भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण घेतले
निलीमा देवी सांगतात, आपण 2019 पासून त्यांनी शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अनेकांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला आपला कल हा भाजीपाला लागवडीकडे अधिक होता. कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भाजीपाला लागवडीच्या तंत्रज्ञानाबरोबच त्याच फायदेही सांगितले. त्यानंतर आपण फळे आणि भाजीपाला पिकाच्या लागवडीचे प्रशिक्षण देखील घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किती मिळतंय उत्पन्न?
निलीमा सांगतात, आपण बाजारातील भाजीपाला व फळ पिकांच्या मागणीचा आढावा घेऊन त्यांची लागवड करतो. ज्यामुळे आपल्याला त्यातून शक्यतो तोटा होण्याचा धोका उद्भवत नाही. ज्यामुळे त्यांना रोपवाटिका आणि फळे-भाजीपाल्याच्या लागवडीतून एकत्रिपणे वर्षाला चार लाख रुपयांची कमाई होत असल्याचे त्या सांगतात. निलीमा देवी या विविध प्रकारची रोपे देखील तयार करतात. यामध्ये मिरची, कोबी, फ्लॉवर, भेंडी, कारले यांच्या रोपांचा देखील समावेश आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक साधनांच्या माध्यमातून शेतीमध्ये उतरण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले आहे.