Success Story : खरबुज शेतीतुन साधली प्रगती; 70 दिवसांत 2 एकरात साडे सात लाखांची कमाई!

Success Story Of Muskmelon Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे काही शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादन खर्च (Success Story) मिळवणे देखील कठीण जात आहे. असे असतानाच काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि आपल्या कल्पकतेच्या जोरावर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अवघ्या दोन महिन्यात खरबुज पिकातून 7 लाख 70 हजाराचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या खरबूज उत्पादनाची आसपासच्या गावात मोठी चर्चा (Success Story) पाहायला मिळत आहे.

उन्हाळी पिकांवर भर (Success Story Of Muskmelon Farming)

चेतन संतोष नागवडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील (Success Story) वांगदरी येथील रहिवासी आहे. उच्चशिक्षित असलेल्या चेतन यांनी नोकरीच्या मागे न धावता, शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात खरबुज, टरबूज या कमी कालावधीच्या पिकांची लागवड केली. अशातच त्यांना यंदा खरबुज फळास चांगला भाव देखील मिळाला. त्यामुळे त्यांना मोठी आर्थिक कमाई झाली आहे.

कुटुंबाची आर्थिक घडी बसली

चेतन नागवडे यांनी श्रीगोंदा येथील एमएपर्यंत शिक्षण घेतले असून, त्यांनी शिक्षक होण्यासाठीची बीएड पदवी देखील मिळवली आहे. मात्र, नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा शिक्षक होऊन दरमहा ठराविक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीत पीक पॅटर्न बदल (Success Story) करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने नियोजन केले. त्यानुसार त्यांनी उन्हाळी टरबूज, खरबुज ही पिक घेण्यावर भर दिला. कोरोना काळापासून दरवर्षी सात एकर पैकी 50 टक्के क्षेत्रावर ते टरबूज खरबूज पीक घेत आहे. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी बसण्यास मदत झाली आहे.

किती मिळतेय उत्पन्न?

शेतकरी चेतन नागवडे सांगतात, यावर्षी प्रथम कांदा पिक घेतले. कांदा काढुन त्या शेतात खरबुजाची दोन एकर क्षेत्रामध्ये 70 दिवसात 38 टन उत्पादन काढले. त्यास 22 ते 26 रूपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळाला. दोन एकरात 7 लाख 70 हजार एवढे उत्पन्न मिळाले असून, आपल्या नियोजन व कष्टाचे चिज झाले असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींचा अवलंब करून, पारंपारिक पिकांच्या मागे न लागता अधिकचा नफा देणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी शेवटी शेतकऱ्यांना केले आहे.