Unseasonal Rain : चिपळूणमध्ये ढगफुटी, अर्धा तास विक्रमी पाऊस; उन्हाळ्यात वाहिल्या नद्या!

Unseasonal Rain In Chiplun
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे मराठवाड्यातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण (Unseasonal Rain) भटकंती करावी लागत आहे. याउलट चिपळूणमध्ये आज (ता.१९) ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाचा व्हिडिओ समोर आला असून, त्या ठिकाणी अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अडरे, अनारी या गावांच्या परिसरातील नद्या प्रवाहित झाल्या आहेत. ज्यामुळे राज्यात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती तर एकीकडे अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) रौद्ररूप पाहायला मिळत आहे.

पुलाचे साहित्य वाहिले पाण्यात (Unseasonal Rain In Chiplun)

ज्यामुळे सध्या सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीमध्ये असलेल्या गावांमध्ये पडलेला मुसळधार पाऊस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे. जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो, त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला आहे. त्यामुळे इथल्या तुडुंब शेताचे आणि वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.

हवामान विभागाकडून स्पष्टीकरण नाही

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला? याविषयी हवामान खात्याकडून अद्याप अधिकृतरीत्या कोणतेही कारण स्पष्टीकरण आलेले नाही. प्रामुख्याने हवामान विभागाने २४ मेपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला असून, सह्याद्रीच्या भागात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे. ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात ओढे झाले प्रवाहित झाले आहे. ज्यामुळे अडरे, अनारी या भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. या दोन गावांमध्ये अल्पावधीत प्रचंड पाऊस झाल्याने नद्यांमधून पुसदृश्य पाणी वाहिले आहे.