Bollywood Farming : ‘हे’ सेलिब्रिटी करतात शेती; वाचा कोणत्या अभिनेते-अभिनेत्रींना लागलाय शेतीचा लळा!

Bollywood Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातच नव्हे तर सध्या देशभरात शेती व्यवसायाला (Bollywood Farming) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अनेकजण आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना देखील शेती व्यवसायाचा लळा लागल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. याच पार्श्वभूमीला आज आपण असे कोणते सेलिब्रेटी आहेत. जे शेती करत आहे. त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे बॉलिवूडचे असेही काही सेलिब्रिटी आहेत जे प्रसिद्धीसाठी नव्हे, तर आवड आणि मातीविषयी (Bollywood Farming) असलेल्या प्रेमामुळे शेती करतात.

हे बॉलिवूड सेलिब्रेटी करतात शेती? (Bollywood Farming)

सलमान खान : सलमान खान अनेकदा त्याच्या पनवेल येथील फार्म हाउसवर शेती करताना दिसतो. सोशल मीडियावर त्याने अनेकदा रोपे लावतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात, तर सलमान अधिकाधिक शेतात काम करायचा, हे त्याच्या समाज माध्यमांवरील पोस्टवरून अनेकदा दिसून आले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी : चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी नवाजुद्दीन हा एक शेतकरी होता. मुजफ्फरनगर येथील बुढाना हे त्यांचे गाव आहे, जिथे त्याची शेती आहे. चित्रपटसृष्टीत नाव कमाविल्यानंतर नवाजुद्दीनला शेताबद्दल विशेष प्रेम वाढले. आताही ते त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून शेतात काम करताना अनेकदा दिसून येतो.

अभिनेता धर्मेंद्र : मूळचा पंजाबचा असलेला अभिनेता धर्मेंद्र यांना त्यांच्या शेतीबद्दल विशेष प्रेम आहे. लोणावळ्यात त्यांचा एक भव्य फार्म हाउस आहे. जिथे त्यांच्या स्टाफच्या साहाय्याने धर्मेंद्र बरेच फळे आणि भाज्या उगवतात. फार्म हाऊसवर गाय, बैल, म्हशी, बकऱ्यादेखील आहेत.

जॅकी श्रॉफ : मुंबई आणि पुण्याच्या मध्ये मावळ येथे जॅकी श्रॉफ यांचा फार्म हाऊस आहे. 44,000 वर्ग फूट एवढ्या परिसरात पसरलेल्या फार्म हाऊसमध्ये ते शेती करतात. येथे त्यांनी पेरूपासून ते सर्व फळे आणि भाज्यांची लागवड केली आहे. स्विमिंगपूलपासून ते बॅडमिंटन, टेनिस कोर्ट यांसारखी लग्झरियस सुविधा आहेत.

पंकज त्रिपाठी : नवाजुद्दीनप्रमाणे पंकज त्रिपाठीदेखील अभिनेता बनण्याअगोदर शेतकरी होते. ते त्यांच्या वडिलांसोबत शेती करत असत. चित्रपटसृष्टीत नाव कमाविण्यापूर्वी सुट्टीत ते गावी जाऊन शेती करून त्यांची इच्छा पूर्ण करायचे.

स्ट्रॉबेरी, चेरी, टोमॅटोची शेती : बॉलिवूडच्या अभिनेत्रीही (Bollywood Farming) शेती करण्यात मागे नाहीत. प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, जुही चावला यासारख्या काही अभिनेत्री आहेत ज्या शेतजमीनीवर भाज्या, फळे पिकवतात. अभिनयासोबतच यातही आनंद मिळतो. असे म्हणत त्या सोशल मीडियावर त्यांच्या शेतातील फोटो शेअर करत असतात. त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. याशिवाय शाहरूख खानची लेक सुहाना खानने अलीकडेच अलिबागच्या वल गावात जमीन खरेदी केली आहे. अशी बातमी आली होती. मात्र, ती शेती करत नाही.