Bajar Bhav News : तूर, हरभऱ्याला मिळतोय विक्रमी भाव; सोयाबीनची घसरगुंडी कायम!

Bajar Bhav News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या तूर व हरभरा उत्पादक शेतकरी हर्षउल्हासित (Bajar Bhav News) असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला कारण तसेच असून गेल्या अनेक दिवसांपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटलसाठी 12 हजार रुपयांहुन अधिकचा दर मिळत आहे. तर हरभऱ्याला देखील प्रति क्विंटलसाठी ६ हजारांहून अधिकचा दर मिळत आहे. याउलट सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण सध्या बाजारात सोयाबीनचे दर ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे तुरीचे दर वाढले सोयाबीनचे दर (Bajar Bhav News) कधी वाढणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

खरिपासाठी आर्थिक जुळवाजुळव (Bajar Bhav News)

शेतीमालाच्या दरावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतमालाची आवक (Bajar Bhav News) वाढली असताना दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीतून शेतकरी खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करताना दिसून येत आहे. सोयाबीन या मुख्य पिकाने शेतकऱ्यांची निराशा केली असली तरी तुरीला आणि हरभऱ्याला विक्रमी दर बाजार समित्यांमध्ये मिळत आहे.

महिनाभरापासून तूर दर 12 हजार पार

शेतशिवारत सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. मशागतीसह पेरणी, बी-बियाणे यासाठी शेतकऱ्यांचा खर्च होणार आहे. गतवर्षी निसर्गाचा लहरीपणा असतानाही सोयाबीनचे उत्पादन वाढले पण वर्षभरापासून दर नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे हरभरा, तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, बाजारपेठेत उच्चांकी दर (Bajar Bhav News) मिळत आहे. सध्याच्या घडीला बाजार समित्यांमध्ये तुरीला 12 हजार रुपये तर हरभऱ्याला 6 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.

सोयाबीनची घसरगुंडी कायम

याउलट सोयाबीनची आवक 9 हजार 300 क्विंटल असताना, सोयाबीनला 4 हजार 500 प्रति क्विंटल अर्थात ४६०० रुपये प्रति क्विंटल या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर वाढीव दर मिळत असलेल्या तूर उत्पादकांची संख्या मोजकीच आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा शेतकऱ्यास दिलासा मिळत असून, असेच दर कायम राहण्याची शेतकरी अपेक्षा करीत आहे.