Success Story : केळीच्या पट्ट्यात सफरचंदाची शेती; जळगावच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग!

Success Story Of Apple Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सफरचंद म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम काश्मीरचे चित्र (Success Story) उभे राहते. मात्र, आता याच काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्या सफरचंदाची महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात यशस्वी शेती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केळी या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात सफरचंदाची शेती करण्यात आल्याने तिची सर्वदूर चर्चा (Success Story) होताना दिसून येत आहे.

केळी पिकातून अत्यल्प उत्पन्न (Success Story Of Apple Farming)

उज्वल पाटील असे या यशस्वी सफरचंद शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचुर गावचे रहिवासी आहेत. नैसर्गिक संकट, कवडीमोल मिळणारा भाव यासारख्या कारणांमुळे (Success Story) केळी पीक परवडत नाही. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांची मदत घेत मेहनतीच्या बळावर आज त्यांनी सुंदर अशी सफरचंद बाग फुलवली आहे.

‘एचआर-९९’ जातीची निवड

शेतकरी उज्वल पाटील यांनी हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्मा यांच्याशी संपर्क साधत तेथील त्यांच्या नर्सरीला भेट दिली. शर्मा यांच्याकडून सफरचंदाची शेतीचे आर्थिक गणित लक्षात घेऊन, त्यांच्याकडून सफरचंदाची ‘एचआर-९९’ या जातीची ३६५ रोपे खरेदी केली. त्यानंतर पाटील यांनी पाऊण एकर क्षेत्रात सफरचंदाची डिसेंबर २०२२ लागवड केली. सध्या या झाडांचे वय हे १६ ते १७ महिने इतके असून, पहिल्या वर्षी या झाडांना मोठ्या प्रमाणात फुलेही आली आहेत. तसेच, सफरचंदाची झाडे देखील सात ते आठ फुटांपर्यंत वाढली आहेत. त्यांच्या या सफरचंद बागेची पहिली काढणी नुकतीच अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी केली आहे.

आंतरपिकांचीही लागवड

शेतकरी उज्वल पाटील सांगतात, आपण यापूर्वी केळीचे उत्पादन घेत होते. मात्र सफरचंदाच्या शेतीला सुरवात केल्यानंतर या शेतीत आंतरपिके देखील घेण्यात आली आहेत. यात जैन इरिगेशनच्या पांढऱ्या कांद्याची यशस्वी लागवड केली होती. त्यानंतर आता पेरूचीही लागवड केली आहे. या पेरूच्या लहान लहान झाडांनाही पहिल्याच वर्षी फळे आली आहेत. पाटील यांनी विशेषत्वाने नमूद करताना म्हटले आहे की, जळगाव जिल्हा म्हंटले की मोठ्या प्रमाणात तापमान असते. परंतु, या प्रचंड तापमानात देखील आपण सफरचंदाची बाग फुलवण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.