Monsoon Update: यंदा पाऊस चांगला राहणार! हवामान अभ्यासकांचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मॉन्सून (Monsoon Update) भारतीय उपखंडात दाखल झाला आहे. यावर्षी पावसाळा चांगला असल्याची माहिती शेती प्रश्नाचे आणि हवामानाचे अभ्यासक उदय देवळाणकर (Uday Devlankar) यांनी दिली आहे.

यावर्षी एकूण पावसाळा चांगला राहणार (Monsoon Update)

यावर्षी एकूण पावसाळा चांगला राहणार आहे. जूनमध्ये अधिकची उष्णता वाटणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जूनमध्ये पावसाला (Monsoon Update) उशीर होईल ही शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच फळबागा, बहुवार्षिक बागायत पिके यांना जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अडचणीत येऊ शकतात. 

अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका (Monsoon Update)

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेचा पारा तापत (Heat Wave) असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता हवामान विभागाकडून (IMD) उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला येथे गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट असल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडत आहे. यामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे देखील आडवी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या स्थितीत काही जणांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाच्या स्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.