Success Story : स्पर्धा परीक्षेत अपयश, पण खचला नाही! कोथिंबीर शेतीतून घेतोय लाखोंचे उत्पन्न!

Success Story Of Farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वाशिमच्या कानडी येथील हनुमान भोयर या तरुणाने उच्च शिक्षण (Success Story) घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता आपल्या शिक्षणाचा शेतीसाठी उपयोग करुन एक एकर शेतात कोथिंबीरची लागवड केली. याच शेतीतून लाखोचे भरघोस उत्पन्न घेत शेती पिकवून आपण चांगले उत्पन्न घेऊन शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे. स्पर्धा परीक्षेत यश न आल्याने अनेक तरुण नैराश्याच्या आहारी जातात. परंतू हनुमान भोयार याने आपली पारंपारित शेती (Success Story) सुरू ठेवली अन् लोखोंचे उत्पन्न घेतले आहे.

अपेक्षित दरामुळे फायदा (Success Story Of Farmer)

हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Success Story) वाढ होत आहे. अनेक जण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. तर काही उच्च शिक्षित तरुण आपल्या गावाकडे नोकरी न करता शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहेत. उन्हाळ्यात बाजारात कोथिंबीरची आवक घटलेली असते. त्यामुळे कोथिंबीरला चांगले दर मिळत असल्याने भोयर यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.

नोकरीऐवजी शेतीमध्ये रमला

वाशिमममधील हनुमान भोयर या तरुणाने उच्च शिक्षणाचा लाभ कुणाच्या ताबेदारीसाठी नव्हे तर स्वतःच्या शेतीसाठी म्हणत आपले कर्तव्य कामातून करून दाखवले आहे. आधीच ग्रामीण भागात बेरोजगारीचा कल हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. यामुळे तरुणांमध्ये नैराश्यच वातावरण निर्माण होत आहे. शासकीय पद भरतीसाठी अभ्यास मेहनत करुन अर्ज करून पाठपुरावा केला जातो. मात्र नोकरी मिळेल याची शाश्वती नाही.

शेतीतून निवडला स्वयंरोजगाराचा मार्ग

यावर मात करीत काही उच्चशिक्षित तरुण हे आपल्या शेतीकडे वळल्याने स्वतःचा मार्ग निवडत लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. कानडी येथील हनुमान भोयर या उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुणाने नोकरीच्या मागे न पडता आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीकडे वळून स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. यातून इतरांना कसा रोजगार मिळवून देता येईल, या उद्देशाने हा तरुण सध्या शेतीत काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.