हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला महिला कोणत्याही क्षेत्रात मागे (Success Story) राहिलेलया नाही. महिला प्रत्येक क्षेत्रात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण करत आहे. शेती किंवा शेती आधारित क्षेत्र देखील याला अपवाद राहिलेले नाही. अनेक महिला या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शेतीमध्ये तसेच शेती आधारीत उद्योगांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवत आहेत. आज आपण अशाच महिला बचत गटाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी एकत्र येऊन गोंदिया सारख्या जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायात क्रांती घडवून आणली आहे. या ३४ महिलांचा गट सध्या दररोज तब्बल १६ लाख ७२ हजार ५६० लिटर दुधाची विक्री (Success Story) करत आहे.
‘अमूल’ला करतायेत दुधाची विक्री (Success Story Of Dairy Farming)
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील महिला बचत गटातील सदस्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय (Success Story) सुरू करण्यात आला आहे. यातून उत्पादित दुधाची विक्री अमूल कंपनीला करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ३४ महिलांच्या परिश्रमाचे चीज होत असून, २०२३-२४ या वर्षात या बचत गटाने एकूण १६ लाख ७२ हजार ५६० लिटर दूध विक्री केली आहे. या दुधाला प्रति लिटर ४६ रुपये दर मिळाला आहे.
किती मिळतेय वार्षिक उत्पन्न?
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे दूध विक्री सोबतच दूध उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. ज्या लाभार्थीकडे एक दुधाळू जनावर आहे. त्यांना दुसरे जनावर खरेदीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या बचत गटातील महिलांनी घेतलेल्या या परिश्रमाचे फलित त्यांना मिळत असून, दूध विक्रीतून प्रत्येक पशुपालकाला ७० हजार ६५० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, सर्व पशुपालक महिलांनी चालू आर्थिक वर्षात सात कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
1.64 कोटींचे कर्ज वाटप
बचत गटातील महिलांनी केलेल्या दूध विक्रीच्या जोडधंद्यातून (Success Story) येणारे उत्पन्न बघून, आता अन्य महिलाही याकडे आकर्षित होत आहेत. या आर्थिक वर्षात ३२४ लाभार्थीनी एक कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ३२४ गाई – म्हशी खरेदी केल्या आहेत. सहा गावांत मुरघास बहुवार्षिक चारा लागवड करण्यात आली आहे. घरोघरी अझोला या संकल्पनेतून ९०० महिलांनी अझोला लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
दूध शीतकरण केंद्राची उभारणी
प्रत्येक गावात दूध संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या केंद्रांना प्रति लिटर एक रुपये कमिशन दिले जात आहे. २०२३-२५ या वर्षांत अदानी फाउंडेशनच्या सहकाबनि तिरोडा व गोंदिया तालुका मिळून ३७ दूध संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन कार्यालयाद्वारे एक कोटी ६४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीतून ३५ हजार लिटरच्या दूध शीतकरण केंदाची उभारणी अतिम टप्प्यात आहे.