Milk Price Hike : अमूलपाठोपाठ मदर डेअरीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ!

Milk Price Hike By Mother Dairy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणूक निकालापूर्वी देशातील दूध दरात (Milk Price Hike) मोठी वाढ झाली आहे. अमूलपाठोपाठ आता मदर डेअरीच्या दुधामध्ये वाढ करण्यात आली आहे. मदर डेअरीने देखील आजपासून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किमती ३ जूनपासून लागू झाल्या आहेत. दूध दरामध्ये वाढ (Milk Price Hike) झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. तर दूध उत्पादकांसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे.

उत्पादन खर्चातील वाढीमुळे निर्णय (Milk Price Hike By Mother Dairy)

मदर डेअरीने सोमवारी दिल्ली-एनसीआर बाजारपेठेत गेल्या १५ महिन्यांत उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्याची घोषणा केली. सर्व प्रकारच्या दुधाच्या किंमतीतील वाढ ३ जून म्हणजेच सोमवारपासून दिल्ली-एनसीआर तसेच इतर बाजारपेठांमध्ये लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मदर डेअरीचे दूध खरेदी करण्यासाठी २ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

हे आहेत नवीन दर

मदर डेअरी कंपनीने ३ जूनपासून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर आता मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाचा दर ६८ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर टोन्ड दुधाचा दर ५४ रुपयांवरून ५६ रुपये प्रति लिटर झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून कच्चे दूध खरेदी करण्यासाठीचा खर्च वाढल्याचे मदर डेअरीने दुधाच्या दरामध्ये वाढ केली. गेल्या काही महिन्यांत मदर डेअरीने आम्ही जादा दर देऊन दूध खरेदी करत असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त तापमानवाढीमुळे देशभरातील दूध उत्पादनावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमूल कडूनही दूध दरात वाढ

अमूल कंपनीही आजपासून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल फ्रेशच्या दरात वाढ केली आहे. अमूल गोल्ड आता ६६ रुपयांना मिळणार आहे. अमूल फ्रेश ५४ रुपयांना मिळणार आहे. अमूल शक्ती हे दूध ६० रुपयांना मिळणार आहे.