Bajarbhav: सोयाबीनसह इतर खाद्य तेलांमध्ये घट, सरकी ढेप आणि गहू दरात तेजी! जाणून घ्या जालना बाजारातील भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सरकार निर्णय, वेगवेगळ्या कृषी उत्पादनाचे बाजारभाव (Bajarbhav) आणि जुलै महिन्यात बाजाराचे हाल याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

केंद्र सरकारने (Central Government) जुलै महिन्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांसाठी (Sugar Factory) 24 लाख टन साखरेचा मासिक विक्री कोटा जाहीर केला आहे. जून 2024 मध्ये 25.50 लाख टन साखरेचा कोटा जारी करण्यात आला होता, तर जुलै 2023 साठी 24 लाख टन कोटा निश्चित करण्यात आला होता.

सोयाबीन आणि खाद्यतेलांच्या दरात घट (Market Rate)

सोयाबीन तेल, पाम तेल आणि तेलबियांचे वायदे व्यवहार पुन्हा सुरू करण्याची आणि खाद्यतेलांवरील आयात शुल्क (Import Duty On Edible Oils) वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सोयाबीनच्या दरात (Bajarbhav) मोठी घट झाली आहे. वायदे बंदी हटवण्यास शेतकर्‍यांचा पाठिंबा आहे.

जालना बाजारपेठेत (Jalna Market) पामतेल 9800, सूर्यफूल तेल 10,400, सरकी तेल 10,100, सोयाबीन तेल 10,200 आणि करडी तेलाचे भाव (Oil Rate) 18,000 रुपये प्रति क्विंटल आहेत.

सरकी ढेप आणि गव्हाच्या दरात तेजी

मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्यामुळे सरकी ढेपच्या दरात (Bajarbhav) पुन्हा तेजी आली आहे.

जालना बाजारपेठेत सध्या सरकी ढेपचे दर 3200 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल आणि सरकीचे दर 3600 ते 3700 रुपये प्रति क्विंटल आहेत.

गव्हाच्या भावात (Wheat Rate) काहीसा चढउतार सुरू आहे. देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2 हजार 400 ते 2 हजार 900 रूपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

इतर बाजारभाव (Bajarbhav)

गहू (300 पोते): ₹ 2500 ते 3000 प्रति क्विंटल

ज्वारी (1300 पोते): ₹ 2000 ते 3200 प्रति क्विंटल

बाजरी (100 पोते): ₹ 2150 ते 2500 प्रति क्विंटल

मका (50 पोते): ₹ 2350 ते 2550 प्रति क्विंटल

तूर (150 पोते): ₹ 6000 ते 11,600 प्रति क्विंटल

हरभरा (350 पोते): ₹ 6100 ते 6550 प्रति क्विंटल

मूग (आवक नाही): ₹ 7000 प्रति क्विंटल

उडीद (10 पोते): ₹ 9000 ते 9300 प्रति क्विंटल

सूर्यफूल (5 पोते): ₹ 4400 ते 4500 प्रति क्विंटल

गूळ (150 भेली): ₹ 3240 ते 4400 प्रति क्विंटल

सोने (प्रति तोळा): ₹ 72,000

चांदी (प्रति किलो): ₹ 89,500

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.