उसावरील तांबेरा रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उस पीक वाढीच्या अवस्थेत असताना कांडी कूज, पोक्का बोईंग तसेच पानावरील तपकीरी ठिपके, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. रोगांची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात. सध्या आडसाळी ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे, तसेच पूर्वहंगामी सुरू आणि खोडवा पीक जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. कमी जास्त प्रमाणात पडणारा पाऊस आणि आर्द्रता यामुळे काही भागात रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. या रोगांची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

तांबेरा

बुरशी – पक्सीनियाा मेलॅनाँसेफाला

काय असतात तांबेरा रोगाचे लक्षण

–उसाच्या पानावर तांबेरा हा रोग पुनक्सिनिया मिल्यानोसेफिला व पुक्सिनिया कुहिनीय या दोन बुरशींमुळे होतो.
–ही बुरशी फक्त ऊस पिकावर उपजीविका करते.
–आधी बुरशीचा प्रादुर्भाव पानांच्या दोन्ही बाजूस होऊन पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात.
–कालांतराने ठिपके लालसर तपकिरी होतात.
–ठिपक्यांचा भोवती फिकट पिवळसर हिरवी कडा तयार होते.
–पानांच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात.
–असे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. हवेद्वारे हे बिजाणू विखुरले जाऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो.
–रोगग्रस्त ठिपक्यांतील पेशी मरुन पाने करपतात.
–प्रकाश संश्लेषण क्रियेत येऊन उत्पादन घटते. साखर निर्मितीवर सुद्धा परिणाम होतो.

रोग वाढीस अनुकूल बाबी

–सकाळचे धुके, दव व थंड वातावरण.
–बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड
–नत्र खतांचा आडसाली उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरणे.

व्यवस्थापन

–ऊस पिकाचे सर्वक्षण करुन, रोगांची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून उपाययोजना कराव्यात.
–प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
–निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
–रोगप्रतिकारक्षम जातीची (को ८६०३२) लागवड करावी.
–लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास उसामध्ये सूर्य प्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
–नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

नियंत्रण

–जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर(फवारणी प्रति लिटर पाणी)
–मॅन्कोझेब ३ ग्रॅम अथवा टेब्युकोनॅझोल १ मि.ली.
–गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन २-३ वेळा फवारणी करावी.