शेतकऱ्यांसाठी GOOD  NEWS : पुणे, सातारासह राज्यातील इतरही भागात पाऊस करणार जोरदार कमबॅक

Rain Paus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात पावसाची आंधळी कोशिंबीर सुरु आहे. मराठवाडा ,विदर्भात तर उन्हाचे चटके बसत असल्याची स्थिती होती. मात्र आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात पुन्हा पाऊस परतणार आहे. 14-18 तारखेदरम्यान कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी होणार आहे.

हवामान खात्याचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 14-18 ऑगस्टसाठी महाराष्ट्रासाठी IMD ने तीव्र हवामान इशारा जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

14 ऑगस्ट -14 ऑगस्ट या दिवशी पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने या भागात दिनांक 14 ऑगस्ट रोजी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

15 ऑगस्ट– या दिवशी मात्र राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात हवामान खात्याकडून इशारा देण्यात आलेला नाही काही भागात मध्यम ते हलक्‍या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

16 ऑगस्ट – दिनांक 16 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

17 ऑगस्ट – दिनांक 17 ऑगस्ट रोजी मात्र राज्यातल्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा देखील असू शकतो असा हवामान विभागाने म्हटले आहे. 17 तारखेला यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, नांदेड, वाशिम, जालना, औरंगाबाद, अहमदनगर तर पुणे, सातारा रायगड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

18 ऑगस्ट – 18 ऑगस्ट रोजी जळगाव, नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुणे, रायगड, सातारा, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.