आनंदवार्ता ! राज्यात पुढील पाच दिवस चंगल्या पावसाचे संकेत

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑगस्ट महिन्यात चांगल्या पावसाच्या खंडा नंतर गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली हा पाऊस फार काळ टिकला नसला तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरिपाला जीवदान मिळाले. पुढील आठवडाभरात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

सातत्याने पडणारे खंड कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मान्सून हवामान हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्ट महिन्यातील अपुऱ्या पावसानंतर चिंता आणखीन भर घातली आहे. आता मान्सूनच्या उर्वरित हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्याभरात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर पूर्व विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडलाय

पुढील दोन आठवड्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या अंदाजानुसार 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण उत्तर महाराष्ट्राचा काही भाग पूर्व विदर्भात पावसाचा प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. तर दुसऱ्या आठवड्यात तीन ते नऊ सप्टेंबर या दरम्यान उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहेत. तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा च्या दक्षिण भागात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

कुठे कधी लावणार पाऊस हजेरी

आज शनिवारी : बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ ,चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि संपूर्ण राज्यात तुरळक सरी बरसतील
रविवारी : लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, येथील संपूर्ण राज्यात तुरळक सरी बरसातील
सोमवारी : लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली संपूर्ण राज्यात तुरळक सरी बरसतील
मंगळवारी : पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, संपूर्ण राज्यात तुरळक सरी बरसतील.