पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणात आज दिनांक 15 रोजी बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून दिसा अहमदाबाद इंदूर पर्यंतचे तीव्रता कमी दाबाचे क्षेत्र ओडीसा गोपाळपुर ते बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय आहे. तर मान्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा पर्यंत ते तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा पर्यंत आहे.

राज्यात सुरु असलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असून विदर्भ मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडतोय आज दिनांक 15 रोजी कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा जलद हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात मुसळधार

हवामान विभागाचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील घाट भागात मागील 24 तासात बहात्तर मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील घाट माथ्यावर आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

यलो अलर्ट – नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर राज्यातील उर्वरित विज्ञान मध्ये ग्रीन अलर्ट म्हणजे कोणताही चेतावणी संदेश देण्यात आलेली नाहीये या ठिकाणी हलक्‍या ते तुरळक सरींचा वर्षाव होण्याची शक्यता आहे.