हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमधील उत्पन्न वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा भडीमार केला जातो. मात्र रासायनिक खतांचा कीटनाशकांचा वापर केवळ आरोग्यासाठी घातक नसून पर्यावरण आणि जमिनीसाठी देखील घातक आहेत. म्हणुनच हल्ली शेतकरी रासायनिक खाते आणि कीटकनाशकांना फाटा देत सेंद्रिय शेतीकडे वळताना पाहायला मिळत आहेत. आजच्या लेखात आपण ह्युमिक ऍसिड बाबत माहिती जणून घेणार आहोत.
ह्युमिक अॅसिड म्हणजे काय ? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सेंद्रिय घटकाच्या जनावरांची विष्ठा व मूत्र, पालापाचोळा आणि शेतातला इतर काडी कचरा कुजून त्याचे विघटन होऊन तयार झालेला पदार्थ म्हणजे ह्युमस. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये ह्युमिक अॅसिड मिळतात जे पोटेशियम ह्युमेट रुपात असते. ज्यामध्ये ह्युमिक अॅसिडवरती कॉस्टिक पोटॉशची प्रक्रिया करून तयार होते. पण तुम्ही देखील सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी ह्युमिक ऍसिड बनवू शकता. ते कसे बनवायचे जाणून घेऊया …
कसे बनवाल हृमिक ऍसिड ? (प्रमाण १ एकर करिता )
साहित्य – जुन्या गोवऱ्या ,गूळ २ किलो ,१.५-२ किलो दही,१०० लिटर पाणी
कृती – एका ड्रम मध्ये किंवा मोठ्या भांडयात पाणी घ्या. या पाण्यात गोवऱ्या घेतलेल्या आहेत त्या गोवऱ्या टाकायच्या आहेत. त्यानंतर १०० लिटर पाण्यात गुळ टाकायचा आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर त्या मिश्रणात दही घालायचे आहे. गोवऱ्या , दही आणि गूळ पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांसाठी उपयुक्त आहेत. हे मिश्रण असेच ५-६ दिवस झाकून ठेवायचे आहे. आणि प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण आपल्याला आठवणीने ढवळायचे आहे. त्यानंतर सहाव्या दिवशी हे १०० लिटरचे मिश्रण २०० लिटरच्या ड्रम मध्ये टाका. त्यामध्ये १०० लिटर पाणी घालायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण गाळून ड्रीपर द्वारे किंवा पाटपाण्यातून आपल्या एक एकर पिकांना द्या. हे मिश्रण जास्तीत जास्त ८ दिवसांमध्ये शेतीसाठी वापरावे त्यानंतर हे मिश्रण पिकांना घालू नये. तयार झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर हे मिश्रण वापरावे. हे मिश्रण फळबागा , भाजीपाला , कोणत्याही पिकांसाठी हे मिश्रण वापरू शकता. महिन्यातून २ वेळा हे पिकांना देणे फायद्याचे आहे.
ह्युमिक अॅसिड चे फायदे
–ह्युमिक अॅसिड वालुकामय मातीमधील पाण्याचा व अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी करते; त्याचबरोबर ह्युमिक अॅसिड वालुकामय मातीला कुजवून उपजावू जमिनिमध्ये रुपांतरीत करते. ज्यामध्ये जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
–पांढऱ्या मुळ्यांची वाढ जलदगतीने करण्यासाठी ह्युमिक अॅसिडचा वापर फायद्याचा ठरतो.
–मातीला तडा जाणे, पृष्ठभागावरून पाण्याचा बहाव कमी करते आणि मातीची धूप थांबवण्यात ह्युमिक अॅसिड महत्वाची भूमिका निभावते.
–ह्युमिक अॅसिडमुळे मातीची पाणी साठवण्याची क्षमता वाढवते आणि त्यामुळे दुष्काळाचा प्रतिकार करण्यास मदत होते.
–ह्युमिक अॅसिडमुळे मातीचा रंग गडद होतो त्यामुळे सूर्याची उर्जा शोषण्यास मदत होते.
–आम्लयुक्त व क्षारयुक्त मातीच्या सामूमध्ये तटस्थता आण्याचे काम ह्युमिक अॅसिड करते.
–अन्न्द्रावे व पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढली जाते.
–ह्युमिक अॅसिड अनेक जैविक प्रक्रियांमध्ये सेंद्रिय उत्प्रेरक म्हणून काम करते.
–पिकांची नैसर्गिक रोग व किडींच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिकार क्षमता वाढवते.
–मुळांची श्वसन प्रक्रिया सुधारते, मुळांच्या वाढीस उत्तेजन देते व मुळांची निर्मिती वाढवते.
–हरितद्रव्यांची, साखरेची व अमिनो आम्लाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो.
–वनस्पतींमधील जीवनसत्व आणि खनिज पदार्थ प्रमाण वाढवते.
–बियाण्याची उगवण क्षमता आणि व्यवहार्यता वाढवते.
–पेशींची विभागणी वाढवून पीक वाढीस उत्तेजन देते (जास्त बायोमास उत्पादन),
–उत्पन्न वाढण्यास मदत होऊन; भौतिक आणि पौष्टिक मूल्य सुधारण्यास मदत करते.