सोयाबीनचा दर घटूनही बाजार समितीत वाढत आहे आवक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरूवातीला सोयाबीनला मिळालेला ११ हजार रुपये क्विंटलचा दर आता थेट ५१०० ते ४८०० पर्यंत गडगडला आहे. मात्र सोयाबीनचा दर घटून देखील आवक मात्र वाढत आहे. सध्या काढणी केलेली सोयाबीनची प्रत ही म्हणावी तशी चांगली नाही. त्यामुळे भविष्यात दर मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांना शाश्वती वाटत नसल्याने मिळेल त्या दारात सोयाबीनची विक्री केली जात आहे. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक झाली होती.

सोयाबीनची काढणी कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय पावसामुळे सोयाबीनच्या दर्जावरही परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये चांगला दर मिळेपर्यंत सोयाबीनची साठवणूक करावी का लागलीच विक्री करावी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्वीधा स्थिती आहे. सोयाबीनची विक्रीच शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. कारण भविष्यात यापेक्षा अधिकची आवक तर होणारच आहे पण सोयापेंड आणि दिवसेंदिवस खाद्यतेलावरील कमी केले जात असलेले आयातशुल्क यामुळे भविष्यात यापेक्षा दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळत असून याच दरात विक्री केली तर भविष्यातील संकट टळणार आहे.

सध्या पावसाने उघडीप दिल्याने काढणी आणि मळणी ही दोन्हीही कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. पावसामुळे सोयाबीन हे डागाळलेले आहे. त्याचा दर्जाही खालावलेला आहे. त्यामुळे साठवणूक केली तरी त्याला बुरशी लागून खराबी होणार शिवाय यापेक्षा कमी दराने भविष्यात विक्री करण्याची नामुष्की आली तर काय ? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे खळ्यावक मळणी झाली की सोयाबीन थेट बाजारात दाखल केले जात आहे.

इतर शेतीमालाचे दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6188 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6375 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4950 रुपये क्विंटल, विजय चणा 5050, चना मिल 4850, सोयाबीन 5400, चमकी मूग 7100, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता.