गुलाबाने बदलले एका गावाचे अर्थकारण, वर्षभर फुलतात मळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातल्या वडजी गावशिवारात सहजच तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला लालचुटुक रंगाची गुलाबाची फुलं बहरलेली दिसतील. वर्षातील बाराही महिने या भागात गुलाबांच्या बागा फुललेल्या असतात. असं म्हंटल तर काही हरकत नाही की वडजी या गावचे संपूर्ण अर्थकारण या गुलाबाच्या बागांवर अवलंबून असते. या गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुलाबांचे उत्पादन घेणारे हे जिल्ह्यातले एकमेव गाव आहे.

एकेकाळी पडवळासाठी प्रसिद्ध होते गाव

सोलापूर- हैदराबाद महामार्गावर दहिटणेपासून आत १० किलोमीटरवर वडजी हे अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे. सोलापूर शहराची बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असल्यानं भाजीपाला, कांदा अशी पिके जास्त प्रमाणात होतात. एकेकाळी पडवळासाठी गाव प्रसिद्ध होते. परंतु अलीकडील आठ-दहा वर्षांत बाजारपेठेचं गणित बदललं. भाजीपाला- फळभाज्यांच्या दरांतील चढ-उतारामुळे वडजीतील शेतकरी गुलाब, झेंडू, शेवंती यासारख्या फुलशेतीकडे वळले.
शिवारात छोट्या- छोट्या बागांमधून लालचुटूक, पाकळ्या पसरून फुललेली देखणी गुलाब फुले आपले लक्ष वेधून घेतात. परिसरातील पिंजारवाडी, तांदूळवाडी या गावांतही फुलशेती चांगलीच वाढली आहे. वर्षभर मार्केटमध्ये चालेल या पद्धतीने ही शेती होते. वडजीत सुमारे सव्वाशे एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र या पिकाखाली असावे. बहुतांश शेतकरी दसरा,दिवाळीसाठी उपलब्ध होईल या पद्धतीने झेंडू लागवडही करतात.सुमारे ५० एकर त्याचे क्षेत्र असावे.

Leave a Comment

error: Content is protected !!