आजचा सोयाबीन बाजारभाव : राज्यातल्या 20 बाजार समित्यांत सोयाबीनला 6500 हुन अधिक भाव …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सोयपेंड आयात करणार नाही अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना दिली आहे. त्यामुळे तूर्तास सोयापेंडीच्या आयातीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे मागील महिनाभरात सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा की नको याबाबत कृषी तज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. सोयाबीनला सरासरी 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला तर शेतकऱ्यांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ञ देत आहेत. आजचे(9-12-21) एकूण सोयाबीन बाजारभाव पाहता केवळ मेहकर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल भाव 7090 इतका मिळाला आहे.

काय आहे सोयाबीन दराचे भवितव्य ?
दिवाळीनंतर मागणी वाढली आणि आवक घटल्याने सोयाबीन कायम दर राहिला आहे. सोयाबीनला 8 हजाराचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, बाजारपेठेत सोयापेंडच्या आयातीच्या वावड्या आणि उन्हाळी सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र यामुळे जर मागणी घटली आणि आवक वाढली तर याचा दरावर परिणाम होणार आहे. शिवाय सोयाबीनचे दर हे 7 हजारापेक्षा अधिक होणार नसल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. शिवाय आता सोयाबीनची साठवणूक करुनही तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी सोयाबीनची विक्री करु लागला आहे.

20  बाजार समित्यांत सोयाबीनला 6500 हुन अधिक भाव
राज्यातल्या विविध २० कृषी उत्पन्न बाजर समित्यांमध्ये सोयाबीनला कमाल भाव ६५०० आणि त्याहून अधिक मिळाला आहे. आजचे(९-१२-२१) एकूण सोयाबीन बाजारभाव पाहता केवळ मेहकर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल भाव 7090 इतका मिळाला आहे. तर चांगला दर मिळण्यासाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला किमान 4900, कमाल 6980, तर सर्वसाधारण 6300 इतका दर मिळाला आहे.

आजचे(9-12-21) सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल (किमान -कमाल-सर्वसाधारण )

माजलगाव —5000 6425 6251
सिल्लोड —6000 6700 6500*
परळी-वैजनाथ–6350 6551 6450*
राहता —5976 6600 6500*
मेहकर —5500 7090 6500*
लातूर —6300 6800 6600*
अकोला —4900 6980 6300*
मालेगाव —5501 6550 6100*
चिखली —5000 6653 5500*
पैठण — 4301 6076 5000
भोकर —2500 6450 4475
हिंगोली- खानेगाव —5900 6400 6150
मुर्तीजापूर —5840 6540 6285*
मलकापूर — 5100 6450 5800
जामखेड —5500 6000 5750
गेवराई —5400 6450 6100
परतूर —6250 6551 6540*
तेल्हारा —5900 6300 6100
देउळगाव राजा—6000 6500 6500*
तळोदा —6000 6500 6300*
नांदगाव —4631 6623 6201*
गंगापूर —6235 6235 6235
आंबेजोबाई —5943 6500 6380*
मुखेड —6300 6600 6500*
मुरुम —5800 6600 6200*
उमरगा —5801 6500 6400*
उमरखेड —5100 5300 5200
काटोल —3500 6181 5780
आष्टी- कारंजा— 4000 6550 5300*
पुलगाव — 6270 6480 6315
घणसावंगी —6000 6500 6400*
देवणी —6505 6711 6608*