पुन्हा धाकधूक : 2021 वर्षाच्या शेवटच्या दिवशी पहा सोयाबीनला मिळाला किती भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२१ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी देखील सोयाबीन दरात चढ -उतार पाहायला मिळाली. या आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीन दरात चांगली वाढ झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा हातावर मोजण्याइतपत बाजार समित्या सोडल्या तर दर उतरलेले पाहायला मिळाले. सोयाबीनला पुन्हा चांगले दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना अद्यापही आहे.

आजचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव पाहता आज केवळ अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 7500 चा जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 3956 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान 5700 रुपये कमाल 7500 रुपये तर सर्वसाधारण 6600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जास्तीत जास्त ६६८० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. जो गुरुवारी 6405 इतका होता. आज वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाव उपलब्ध झालेला नाही. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 6980 प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता. मात्र आज २३० घसरण होऊन हा दर ६७५० प्रति क्विंटल इतका मिळाला आहे.

उन्हाळी सोयाबीनची आवक वाढवतीये धास्ती
शिवाय आता उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यावर अणखीन दर खालावतील याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे वाढीव दरात सोयाबीन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला खरा पण आता तो टिकून राहतो की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील एका दिवसांमध्ये सोयाबनच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आगामी आठवड्याच्या बाजारावर याचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

आजचा 31/12/2021 सोयाबीन बाजारभाव

शेतमाल– जात/प्रत– परिमाण –आवक– कमीत कमीदर– जास्तीत जास्त दर– सर्वसाधारण दर

शहादा — क्विंटल 7 6151 6300 6275
औरंगाबाद — क्विंटल 8 5100 6000 5550
माजलगाव — क्विंटल 328 5600 6126 5850
उदगीर — क्विंटल 2475 6100 6231 6165
कारंजा — क्विंटल 4000 5885 6250 5925
परळी-वैजनाथ — क्विंटल 375 5701 6275 6150
तुळजापूर — क्विंटल 150 6100 6100 6100
राहता — क्विंटल 29 5899 6284 6200
अमरावती लोकल क्विंटल 3956 5700 7500 6600
हिंगोली लोकल क्विंटल 500 5805 6305 6055
मेहकर लोकल क्विंटल 820 5500 6300 6000
मेहकर नं. १ क्विंटल 160 6000 6750 6400
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 125 4700 6290 6231
अकोला पिवळा क्विंटल 1430 5900 6680 6250
यवतमाळ पिवळा क्विंटल 818 3950 6300 5125
चिखली पिवळा क्विंटल 529 5900 6525 6213
पैठण पिवळा क्विंटल 5 5960 5960 5960
धामणगाव -रेल्वे पिवळा क्विंटल 1100 5800 6430 6150
भोकर पिवळा क्विंटल 35 5013 6200 5607
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 325 5800 6200 6000
जिंतूर पिवळा क्विंटल 112 5600 6245 6000
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 800 5850 6225 6110
अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 45 5400 6000 5800
परतूर पिवळा क्विंटल 42 5900 6200 6170
गंगाखेड पिवळा क्विंटल 21 6250 6425 6300
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 25 5300 6200 6100
तासगाव पिवळा क्विंटल 35 6100 6400 6250
गंगापूर पिवळा क्विंटल 14 5200 5950 5600
मंठा पिवळा क्विंटल 36 4400 6101 5500
मुखेड पिवळा क्विंटल 20 6000 6300 6300
मुरुम पिवळा क्विंटल 328 5500 6360 5930
उमरगा पिवळा क्विंटल 12 6000 6200 6100
बसमत पिवळा क्विंटल 222 6005 6355 6180
पुर्णा पिवळा क्विंटल 36 6090 6320 6103
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 12 5681 6150 6000
पांढरकवडा पिवळा क्विंटल 85 6000 6160 6100
उमरखेड पिवळा क्विंटल 230 5500 5800 5700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 250 5500 5800 5700
राजूरा पिवळा क्विंटल 48 5755 6295 6290
पुलगाव पिवळा क्विंटल 26 6050 6180 6125
बोरी पिवळा क्विंटल 3 6005 6005 6005