थंडी ओसरली… ! मुंबई ,पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीस अंशांच्या पार गेला. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी ओसरली आहे. आज दिनांक 19 रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी दिनांक 18 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि फुरसतगंज इथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 2.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज उत्तर प्रदेश बिहार आणि मध्यप्रदेश इथं थंड दिवसाची स्थिती कायम
राहणार आहे.

मंगळवारी दिनांक 18 रोजी अंशतः ढगाळ हवामान होतं धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेलं. तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी 33.5 सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, सोलापूर, रत्नागिरी, अलिबाग ,वाशीम, यवतमाळ इथेही तापमानाचा पारा तिशी पार गेलाय.

दरम्यान हवामान तज्ञ केस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठरा रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथे तीस अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा इथं जास्तीत जास्त 27.5 अंश सेल्सिअस ची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये ही तापमानात वाढ झालेली दिसून येते आहे पुण्यामध्ये 3.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद दिनांक 18 रोजी करण्यात आलेली आहे. तर इथं कमीत कमी तापमान हे 12 ते 14 डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.