हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या काही भागात हलक्या ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सारी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किमान तापमानात घट होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर अरबी समुद्रात गुजरातच्या किनार्यालगत ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाला आहे.
आज ‘या’ भागात पावसाची शक्यता
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानाचा होत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, पालघर, ठाणे ,मुंबई ,रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो त्यानंतर मात्र 25 तारखेपर्यंत राज्यातला हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे राहील असे वेधशाळेने म्हटले आहे.