ईशान्य भारतात पाऊस तर महाराष्ट्रात वाढतोय उन्हाचा चटका…!

heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमान हे तिशीच्या पार गेले आहे. शुक्रवारी दिनांक चार रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर व वाशीम इतर राज्यातील उच्चांकी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी धुके पडल्याचे चित्र ही पाहायला मिळाले. आज दिनांक 5 रोजी तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

भारताच्या ईशान्य भागात पाऊस

दरम्यान वायव्य भारतातील पश्‍चिमी चक्रावात त्याच्या प्रभावामुळे राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यात यातच बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या भाजपाच्या पुरवठ्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडतोय. आज दिनांक 5 रोजी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश पूर्वोत्तर राज्यांमध्ये गारपिटीचा पावसाची शक्यता आहे.

कुठे किती तापमान
उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे गहू संशोधन केंद्रात शुक्रवारी 8.6 अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात नऊ अंश सेल्सिअस तर उर्वरित राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान देखील 32 अंशांच्या पुढे गेले आहे. सांगली , नांदेड, परभणी, अकोला, वर्धा, यवतमाळ इथं पारा 33 अंशांच्या वर आहे. दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात 15-22 अशांची तफावत दिसून येत आहेत