Agri Disputes : तुमचंही बांधावरून भांडण होतंय का? बांध कोरणाऱ्याला असा शिकवा धडा!

Agri Disputes Over Land Boundary
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वारसा हक्कामुळे जमिनीचे विभाजन होत असून, आज गावागावांमध्ये शेतकऱ्यांचे बांधावरून वाद (Agri Disputes) सुरु असल्याचे पाहायला मिळते. सख्य्या भावाभावांमध्ये देखील बांधावरून लाठ्या-काठ्या आणि हाणामारी होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. काही लोक बांध कोरण्यात बरेच पटाईत असतात. त्यामुळे तुमचाही बांध शेजारच्या शेतकऱ्याने कोरला असेल तर तुम्ही त्याला कायदेशीर मार्गाने (Agri Disputes) धडा शिकवू शकतात.

बांध कोरण्यासोबतच एखाद्या शेतकऱ्याने तुमच्या जमिनीवर बेकायदा अतिक्रमण (Agri Disputes) केले असेल तुम्ही ते देखील काढू शकता. त्यासाठी कायदेशीर मार्ग काय आहे? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा. प्रामुख्याने गावांमध्ये बांध कोरण्याचा प्रकार हा प्रत्येक शेतकऱ्यासोबत होत असतो. काही लोक जाणूनबुजून समोरच्या शेतकऱ्यांना त्रास देत असतात. अशावेळी बांधावरील भांडण हे रोजच होत असते. तर शहरांमध्येही अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेले असते.

अतिक्रमण म्हणजे काय? (Agri Disputes Over Land Boundary)

अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याची जमीन आपल्या हिश्यात घेणे. किंवा शेजारच्याच्या जमिनीवर ताबा करून ती जमीन स्वतः वापरात आणून स्वतःचीच आहे असे भासविणे होय. आज गावातील प्रत्येक शेतकरी बांध कोरण्याच्या समस्येतून जात आहे. कधी-कधी तर बांध कोरण्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची जमीन मोठ्या प्रमाणात शेजारच्या शेतकऱ्याच्या ताब्यात असते. तुम्हालाही वाटत असेल की शेजारच्या शेतकऱ्याच्या ताब्यात तुमची जमीन गेली आहे. तुमच्या जमिनीवर त्याने अतिक्रमण केले आहे. तर तुम्ही आता घरबसल्या तुमची जमीन मोजू शकतात. आणि अशी जमीन कायदेशीर मार्गाने परत मिळवू देखील शकतात.

अशी मोजा घरबसल्या जमीन?

गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असे सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. (Link : https://bit.ly/HelloKrushiApp), ऍप Install केल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा. त्यानंतर ‘हॅलो कृषी’ च्या होम पेजवर ‘उपलब्ध सेवा’ या अंतर्गत विविध विभाग दिसतील. त्यापैकी ‘जमीन मोजणी’ हा विभाग निवडा. त्यानंतर तुम्ही सध्या कुठे आहात (तुमच्या ज्या जमिनीची मोजणी करायची आहे) ते स्थान/लोकेशन सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल. डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा (हेक्टर, एकर, गुंठा, बिघा). त्यानंतर जमिनीची मोजणी करण्यासाठी तुमच्या जमिनीचे एक-एक कोपरे निवडा. म्हणजेच चारही कोपऱ्यांवर क्लीक करा. आता जेवढा भाग निवडला गेला आहे तेवढा हिरव्या रंगात दिसेल. शिवाय त्याचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे. किंवा तुमची जमिनी किती बिघे, गुंठा, एकर आहे, याची सर्व आकडेवारी देखील येईल.

काय आहे कायदेशीर प्रक्रिया?

आता आपण तुमच्या मनातील शंका दूर केली. तुमची जमीन शेजारच्या शेतकऱ्याच्या ताब्यात आहे की नाही मोबाईलवरील हॅलो कृषी अॅपच्या माध्यमातून तुम्हाला समजलेच असेल. जर तुमची शेजारच्या शेतकऱ्याकडे असेल तर तुम्ही त्या जमिनीच्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी ही सरकारी पद्धतीने करून तुम्ही तुमची जमीन पुन्हा मिळवू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयात जमीन मोजणीचा रीतसर अर्ज करू शकतात.

कसा कराल अर्ज?

जमीन मोजणी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर… (https://hellokrushi.com/land-survey-application-process-in-maharashtra/)

जमिनीची सरकारी मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा ‘क’प्रत ही भूमिअभिलेख कार्यालयाकडून दिली जाते. त्या नकाशा ‘क’ प्रतवर तुमच्या जमिनीची सर्व बाजू दाखविल्या जातात. त्याचबरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्र सुद्धा दाखविले जात असते. जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेला शेतकरी अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसेल तर तुमच्याकडे आणखीन एक पर्याय आहे. तो म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतात. महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 138 नुसार हा अर्ज तुम्ही करू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून, तो अर्ज तुम्हाला तहसिलदार यांच्याकडे करावयाचा असतो.

तहसीलदारांना करावयाचा नमुना अर्ज – (https://drive.google.com/file/d/12qaRhnRLWkCnwUqF-JS8QB-96m5brwwB/view)

अर्जासोबत जोडा ‘ही’ कागदपत्रे

  • तुमच्या अतिक्रमण झालेल्या जमिनीचा कच्चा नकाशा.
  • तुम्ही सरकारी अतिक्रमण झालेल्या जमिनीची शासकीय मोजणी केलेली असेल तर शासकीय मोजणीची प्रत किंवा जमिनीचा मूळ नकाशा जोडा.
  • अतिक्रमण झालेल्या जमिनीचा तीन महिन्याच्या आतील सातबारा.
  • अतिक्रमण झालेल्या जमिनीबाबत न्यायालयात काही वाद सुरु असेल तर त्या संबंधित सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.
  • अर्जामध्ये जमिनीचा सर्व्हे नंबर आणि गट नंबर आवश्यक ठळकपणे टाकावा. तसेच जमिनीची चतु:सीमा टाकावी.
  • अर्जदाराला अर्ज करताना कोर्ट स्टॅम्प लावावा लागतो आणि तहसील कार्यालयात जाऊन पावती घ्यावी.
  • वरील सर्व कागदपत्रे ही अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करायचा असल्यास अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अशा पद्धतीने तुम्ही कायदेशीर पद्धतीने शेत जमिनीवरील अतिक्रमण काढत आपली जमीन कायदेशीर मार्गाने परत मिळवू शकतात.