हॅलो कृषी ऑनलाईन : शेती आणि शेतीशी संबंधित अनेक प्रकारचे उद्योग (Agriculture Business) आहेत. कृषी क्षेत्राची व्याप्ती ही खूप मोठी असल्या कारणाने अनेक उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी यामध्ये संधी आहेत. शेती क्षेत्रातील उत्पादित मालाशी संबंधित देखील अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपल्याला उभारता येतात. असाच एक चांगला नफा देणारा व्यवसाय शेतकरी करू शकतात. तो म्हणजे कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय होय. शेतीमध्ये उत्पादित होणारे भाजीपाला, फळे हे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवण्याची सुविधा असणे खूप गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण ग्रामीण किंवा निमशहरी भागात उभारता येऊ शकणाऱ्या कोल्ड स्टोरेज व्यवसायाबाबत (Agriculture Business) जाणून घेणार आहोत.
‘कोल्ड स्टोरेज’चा व्यवसाय (Agriculture Business For Farmers)
तुम्हाला हा ‘कोल्ड स्टोरेज’चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरात असणाऱ्या बाजारपेठेचा चांगला अभ्यास करून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही राहत असलेल्या दहा ते पंधरा किलोमीटर पट्ट्यात कुठल्या प्रकारच्या फळांची व भाजीपाल्याचे उत्पादन होते. तसेच दुग्ध व्यवसाय किती प्रमाणात आहे. किंवा एखाद्या मत्स्य किंवा चिकन किंवा मटण मार्केट इत्यादी गोष्टींकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यासणे गरजेचे आहे.
‘या’ व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी
‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फॅक्टरी लायसन्स, फायर अँड पॉल्युशन डिपारमेंट आणि हॉर्टिकल्चर बोर्डाचे परमिशन, जीएसटी नंबर आणि उद्योग रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. कोल्ड स्टोरेज उभारतांना त्याची क्षमता पाच मेट्रिक टन मालाची करायचे असेल तर त्यासाठी 50 ते 60 स्क्वेअर फुटांची जागा लागते व विजेचा पुरवठा हा 24 तास राहील हे खूप महत्त्वाचे असते. या व्यवसायासाठी (Agriculture Business) तुम्हाला दहा ते बारा वर्कराची आवश्यकता असते. यामध्ये तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादित माल उत्पादन भाड्याने तुमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतात किंवा स्वतःचे उत्पादन देखील ठेवू शकता. यामध्ये चांगली कमाई होते.
व्यवसायासाठी लागणारे भांडवल : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये भांडवल लागते.
लागणारी यंत्रसामुग्री : ‘कोल्ड स्टोरेज’ व्यवसायात प्रामुख्याने कोल्ड स्टोरेज यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासते व यंत्रसामग्री तुम्हाला अडीच ते तीन लाख लाखापर्यंत मिळू शकते.
मनुष्यबळ : या व्यवसायासाठी तुम्हाला पाच ते सहा मनुष्यबळाची आवश्यकता असते.
ग्राहक कसे मिळवाल : तुम्ही मार्केटमध्ये जाऊन शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तुमचा कोल्ड स्टोरेजची माहिती देऊ शकतात तसेच दूध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून स्टोरेजसाठी माल भाड्याने घेऊ शकतात. तसेच वेगवेगळे मॉल्स, भाजीपाला आणि फळे पिकवणारे शेतकऱ्यांकडून देखील ऑर्डर मिळू शकते.