Agriculture Export : कांद्यासोबतच गहू, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनाही निर्यातबंदीचा फटका!

Agriculture Export From India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने कांदा पिकासोबतच गहू आणि तांदूळ निर्यातीवर (Agriculture Export) देखील बंदी घातली आहे. ज्यामुळे कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना देखील प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल 26 पटीने घसरली असून, वर्षभरात गव्हाची 45 लाख टन कमी निर्यात झाली आहे. ज्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांसोबतच देशाला 11,377 कोटींच्या परकीय चलनाला मुकावे लागले आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षभरात तांदळाचीही 77 लाख टन निर्यात (Agriculture Export) कमी होऊन, त्याद्वारेही देशाला 17,278 कोटींच्या परकीय चलनाला मुकावे लागले आहे.

गव्हाला प्रचंड मागणी (Agriculture Export From India)

कृषिप्रधान भारताचा अन्नधान्यांच्या निर्यातीमधील वाटा 2023-24 या आर्थिक वर्षात कमी झाला आहे. एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान एपीडाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार (Agriculture Export) गहू, तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 72 लाख 39 हजार टन गहू निर्यात केला. 15,840 कोटींची उलाढाल झाली होती. पण 2022-23 मध्ये निर्यात घटून 46 लाख 93 हजार टन झाली. याशिवाय आर्थिक उलाढालही 11,826 कोटीपर्यंत खाली आली आहे.

निर्यातीतील घसरण चिंताजनक

2023-24 या आर्थिक वर्षात देशात गव्हाचा तुटवडा होईल, या भीतीने निर्यातीवर निर्बंध टाकण्यात आले. यामुळे आर्थिक वर्षातील 11 महिन्यांत निर्यात 26 टक्क्यांनी घटून, 1 लाख 79 हजार टनांवर आली. उलाढालही केवळ 449 कोटी रुपये झाली आहे. गहू निर्यातीमधील ही घसरण अत्यंत चिंताजनक समजली जात आहे. याशिवाय भारतीय तांदळालाही जगभर मागणी आहे. परंतु, 2022-23 मध्ये 1 कोटी 77 लाख टन तांदूळ निर्यात केला होता. निर्यातीमधून 51,088 कोटींची उलाढाल झाली. याउलट 2023-24 वर्षात निर्यात 1 कोटी टन झाली आहे. तांदळाला जगातील 150 देशांमधून मागणी आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्बंधामुळे या निर्यातीमध्येही घट झाली आहे.