अलर्ट! आज राज्यात पाऊस ; कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात अजून दाट होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र समुद्रावरुन वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रायगड, पुणे सातारा रत्नागिरी, सिंधूदूर्ग, कोल्हापूर आज पहाटे पासून ढगाळ आकाश आहे. त्यामुळे या भागात पावसाची श्यक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कोकणा पर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्या लागत आज मंगळवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून बुधवारपर्यंत तिची तीव्रता वाढणार आहे. उत्तर केरळपासून उत्तर कोकणा पर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दरम्यान उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेत बुधवारपर्यंत या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे गुरुवारी हे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनार्‍याकडे येण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. सर्वच विभागात थंडी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात दहा अंशांच्या खाली घसरलेला तापमान बहुतांश ठिकाणी 18 वर्षांच्या पुढे गेला. सोमवारी दिनांक 15 रोजी सकाळी निफाड येथे नीचांकी 15.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शांताक्रुज उच्चांकी कमाल तापमान 36.5 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.