सतर्क रहा …! आज राज्यात जोरदार पाऊस, हवामान खात्याकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज दिनांक 11 रोजी उत्तर कोकणातील पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत

बंगालच्या उपसागरात दक्षिण थायलंड जवळ हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमान समुद्राकडे सरकत आहे. ही प्रणाली वायव्येकडे असून भारताच्या पूर्व किनारपट्टी कडे येताना तीव्र होऊन बंगालच्या उपसागरात शुक्रवार पर्यंत म्हणजेच तीन (३) तारखेपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ आंध्र प्रदेश ओरिसाच्या किनार्‍याकडे येण्याची शक्यता आहे. दरम्यान अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांचे व चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्या लगतच्या समुद्रात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज राज्यात ऑरेंज अलर्ट

दक्षिण-पूर्व आरबी समुद्र मालदीव लक्षदीप वर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तिथून पूर्व व मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती आहे. येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व आरबी समुद्र मालदीव लक्षदीप मध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. तसेच राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तर आज दिनांक 1 डिसेंबर रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, पुणे ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. इथं मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तर उद्या म्हणजेच 2 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना ,बीड आणि जळगाव इथं मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

सोयाबीन , कापूस असा काढणी झालेला माल शेतकऱ्यांनी जपून ठेवावा. अशा पावसाळी वातावरणामुळे माल खराब होऊ नये याची दक्षता घ्यावी. आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी. वीजा होत असल्यास शेतात अथवा घराबाहेर जाणे टाळावे. धोकादायक पूलावरून प्रवास करू नये.