कलिंगडाच्या शेतीतून शेतकऱ्याला बंपर लॉटरी ; मिळवले तब्बल 51लाखांचे उत्पन्न

watermelon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपारिक ऊस, केळी या पिकांना बगल देवून माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुनील चव्हाण या शेतकर्याने कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी, खते आणि किडनाशक फवारणींचे योग्य नियोजन करुन त्यांनी सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या दर्जेदार कलिंगडाला तब्बल 34 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे.

51 लाखाचे मिळाले उतपन्न

लागवडी पासून ते काढणी पर्यंतच्या 51 दिवसांमध्ये त्यांना 51 लाखाचे उत्पादन मिळाले आहे. त्यांचा निर्यातक्षम कलिंगड शेतीचा हा प्रयोग इतर शेतकर्यांसाठी आदर्श ठरला आहे.सुनील चव्हाण यांनी जून महिन्यात सहा एकर क्षेत्रामध्ये35 हजार कलिंगड रोपांची लागवड केली होती. लागवडीपूर्वी शेतीची मशागत करुन शेणखत वापरले होेते. शिवाय सोबतच ठिबकसिंचनही केले. खते, पाणी आणि किड रोग नियंत्रण फवारण्यांचे योग्य नियोजन केल्यामुळे त्यांना सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले. त्यांचे चवदार कलिंगड परदेशात निर्यात होणार असून तेथील खवय्यांना कलिंगडाची चव चाखायला मिळणार आहे.

दोन दिवसापूर्वी चव्हाण यांच्या कलिंगडाची तोडणी करण्यात आली. 2 किलो पासून 8 किलो वजना पर्यंतच्या कलिंगडाची विक्री केली. जागेवरती 34 रुपये किलोचा भाव मिळाला. एकर कलिंगडासाठी त्यांना चार लाख रुपयांचा खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना तब्बल 47 लाख रुपयांचा नफा मिळाला. गेल्या तीन वर्षापासून सातत्याने ते कलिंगडाची लागवड करतात. मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे जेमतेम 10 ते 20 रुपये दर मिळाला होता. यावर्षी मात्रत्यांना कलिंगड पिकातून बंपर लाॅटरी लागली आहे. तब्बल 34 रुपयांचा दर मिळाला आहे.