कूल…! कूल …! राज्यात तापमानाचा पारा घसरला , मुंबई, पुण्यात धुळीचे वादळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागात तापमानाचा पारा घसरला असून असेच वातावरण पुढील दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. आज दिनांक 24 रोजी किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच राज्यात धुळीचे वादळ धडकले आहे. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मुंबई ,पुण्यात वाढले धूलिकणांचे प्रमाण
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्र मार्गे महाराष्ट्रत पोहोचले आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृश्यमानता कमी झाली असून मुंबई पुण्यात धुळीकणांचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानातून आलेले धुळीचे वादळ रविवारी अरबी समुद्रात पोहोचले आहे. त्यानंतर या वादळाने पुणे, मुंबई आणि उत्तर कोकणात दाखल झाले आहे. या वादळाने दृश्यमानता कमी झाली. मुंबई आणि पुण्यात धुळीच्या वादळामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच तापमानाची घट झाली आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा वाहत असून गारठा वाढला आहे. 20 ते 25 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत आहे. पुण्यात अतिसूक्ष्म धुलीकरणाचे प्रमाण पीएम 2.5 इतके आहे. तर धुलीकरणाचे प्रमाण सध्या पीएम 10 प्रमाणे साधारणपणे 100 प्रति घनमीटर इतके झाले आहे.

तापमानात घट
हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात चांगलीच घट नोंदवण्यात आली आहे. पुण्यात आज पहाटे एक अंकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. पाषाण इथं 9.4 डिग्री सेल्सियस,NDA ८. ८,जुन्नर ८. ७ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. याबरोबरच महाबळेश्वर येथे 6.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती. हवामान तज्ञ केस होसाळीकर यांनी दिली आहे.