Cotton : राज्यात काही ठिकाणी पाऊस होत आहेत तर काही ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापासून ढगाळ व दमट वातावरण यामुळे कापुस पिकावर मावा ,तुडतुडे व काही प्रमाणात थ्रीप्स या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत. एकीकडे पिकाला योग्य तो भाव मिळत नाही आणि दुरीकडे किडीमुळे पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभा राहली आहे.
बरेच शेतकरी सतत निकोटिन गटामधील इमिडाक्लोप्राइड (कॉन्फिडार) हेच कीडनाशक पुन्हा पुन्हा फवारत आहेत त्यामुळे मावा व तुडतुडे या किडीची अधिक प्रतिकारक्षम पिढी जन्माला येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो कापुस पिकावर इमिडाक्लोप्राइड या रासायनिक औषधची पाहिली फवारणी चुकुनही करू नये. अन्यथा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. (Agriculture News )
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कापुस पिकावर इमिडाक्लोप्राइड या रासायनिक औषधची फवारणी करायची नाही तर मग कोणत्या औषधाची फवारणी करायची. चलातर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. (Cotton spray)
शेतकरी मित्रांनो ही माहिती जाणून घेण्याआधी जर तुम्हाला कृषी संबंधी माहिती मिळवण्यास कोणतीही अडचण येत असेल तर आत्ताच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला कृषी योजना, जमीन मोजणी, रोजचे ताजे बाजारभाव, हवामान अंदाज अशा अनेक गोष्टींची माहिती मिळेल. त्यामुळे हे अँप एकदा डाउनलोड करून पाहाच
कापुस पिकावर पहिली फवारणी करताना घरी तयार केलेले निबोळी अर्क 5% किंवा 1000 ppm नीबोळी अर्क 40 ml + अँसिटामीप्राईड ( माणिक) 10 ml किंवा थायामेथॉक्सम 25% WG (ॲक्टरा) किंवा बुप्रोफेझिन-25 sc किंवा एसीफेट-75 sp सोबत rcf मायक्रोला (सूक्ष्म मूलद्रव्य) ची फवारणी करणे उचित ठरेल
कापुस पिकावर फवारणी करताना प्रत्येक वेळेस पेट्रोल पंपाचा उपयोग करावा त्यामुळे कापसाचे झाडं झटकले जाऊन प्रेशरने फवारणी होते तसेच फवारणी करताना उलट्या दिशेने फवारणी करावी
त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कापुस पिकावर पहिली आणि दुसरी फवारणी करताना उलट्या नोझलने म्हणजेच नोझलचे तोंड आकाशाकडे न ठेवता पानाच्या खालच्या बाजूने ठेवावे त्यामुळे खालच्या बाजूंनी रससोषक किडीचा प्रादुर्भाव असल्याने वरील प्रकारच्या फवारणीमुळे 90-95% किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. जर तुम्ही अशा प्रकारे फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि तुमचे कापूस पीक देखील चांगले येईल.