Cucumber Farming : एक एकरात काकडीची लागवड; शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती!

Cucumber Farming Farmer Success Story
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेक तरुण स्वतःला शेतीमध्ये (Cucumber Farming) झोकून देत आहे. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा वापर ते शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी करत आहेत. विशेष म्हणजे हे सुशिक्षित तरुण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी उन्हाळी काकडी (Cucumber Farming) उत्पादनातून स्वतःची आर्थिक प्रगती साधली आहे.

शिक्षणानंतर धरली शेतीची वाट (Cucumber Farming Farmer Success Story)

नरेश गजभिये असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील रहिवासी आहेत. नरेश गजभिये यांची स्वतःची वडिलोपार्जित केवळ एक एकर जमीन आहे. पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता, शेतीमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत, काकडीची लागवड (Cucumber Farming) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकरी नरेश गजभिये यांनी आपल्या एक एकरात यंदाच्या उन्हाळ्यात काकडीची लागवड केली होती.

किती मिळतोय दर?

विशेष म्हणजे शेतकरी नरेश गजभिये यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून, कमी पाण्यात आपल्या शेतातील विहिरीच्या माध्यमातून काकडीचे पीक घेतले आहे. नरेश यांना यंदा पहिल्याच वर्षी काकडीचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. ते सांगतात, काकडी विक्री करण्यासाठी आपल्या मार्केटमध्ये जाण्याची देखील गरज पडली नाही. कारण, नागपूर येथील व्यापारी शेतात येऊन, दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे काकडी खरेदी करून घेऊन जात आहे. ज्यामुळे काकडीच्या शेतीतून आपल्या आर्थिक समृद्धी मिळण्यास मदत झाली आहे.

सहा जणांना दिला रोजगार

शेतकरी नरेश गजभिये सांगतात, काकडीची लागवड केल्यानंतर आपल्याला नियमित तोडणीसाठी, पाच ते सहा मजुरांची गरज पडते. काकडी पिकाला मोठ्या प्रमाणात काकडी लगडली असल्याने, त्यासाठी आपल्याकडे दोन मजूर नियमित काम करत आहे. तर तोडणीच्या दिवशी आपण पाच ते सहा जणांना काम देतो. ज्यामुळे व्यापाऱ्यांना थेट बांधावर माल खरेदी करण्यास मदत होते. परिणामी, शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या मागे न लागता अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.