आजही सोयाबीनचा कमाल दर NOT OUT 8000 रुपयांवर ; पहा आजचे राज्यातील बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो महाशिवरात्रीच्या सुट्टीनंतर आता आज सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनचे दर वाढून कमाल भाव ८ हजार रुपयांवर गेले होते. आजही सोयाबीनला राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये चांगले भाव मिळालेले दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर होतो आहे. रशिया आणि युक्रेन देशातून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात होते. मात्र युद्धामुळे त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील सोयाबीन बाजार भावानुसार आज सर्वाधिक भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून हा भाव 8000 प्रति क्विंटल इतका आहे. आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 2240 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5600, कमाल भाव 8 हजार आणि सर्वसाधारण भाव सात हजार रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती 7750, नागपुर 7500, सोलापूर 7300, राहता सात हजार चारशे सोळा, गंगाखेड 7700, नांदगाव 7500, लासलगाव निफाड 7600 असे कमाल भाव सोयाबीनचा आज मिळाले आहेत तर सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे सहा हजार पासून7500 रुपयांपर्यंत आहेत.

शिवाय सध्या सोयाबीनला चांगला दर मिळत असून शेतकऱ्यांनी विक्रीबाबत निर्णय घ्यावा अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय दर आणखी वाढण्याची शक्यता आहे पण ते किती काळ टिकतील हे सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 2-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/03/2022
शहादाक्विंटल75708275517376
राहूरी -वांबोरीक्विंटल3710071007100
सिल्लोडक्विंटल10690072007000
कारंजाक्विंटल3200600072756850
राहताक्विंटल38707674167350
धुळेहायब्रीडक्विंटल12670067006700
सोलापूरलोकलक्विंटल212640073007175
नागपूरलोकलक्विंटल367600075007125
मेहकरलोकलक्विंटल930590077507200
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल321690076007550
चाळीसगावपांढराक्विंटल14600070006500
जालनापिवळाक्विंटल3169700074507300
अकोलापिवळाक्विंटल2240560080007000
यवतमाळपिवळाक्विंटल406600074006700
चिखलीपिवळाक्विंटल1434645075006975
पैठणपिवळाक्विंटल15688168816881
भोकरपिवळाक्विंटल18670972506979
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल25600072006600
गंगाखेडपिवळाक्विंटल42740077007400
नांदगावपिवळाक्विंटल3300075006500
तासगावपिवळाक्विंटल30620064006300
गंगापूरपिवळाक्विंटल5480068116500
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल75700073007150
सेनगावपिवळाक्विंटल550650073007000
उमरखेडपिवळाक्विंटल660590061006000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल380590061006000