राज्यात पावसाची उघडीप ; गारठा वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिली असून आकाश झाले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडलाय. शनिवारी दिनांक 4 रोजी रात्री आणि रविवारी पहाटे राज्याच्या अनेक भागात दाट धुक्याचा आच्छादन होतं. आज दिनांक 6 रोजी राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून हळूहळू गारठा परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाबळेश्वर येथे 12.5 किमान तापमान
ढगाळ हवामानामुळे कमी झालेलं कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊन राज्यात हळूहळू गारठा वाढण्याची शक्यता आहे. रविवारी दिनांक 5 रोजी महाबळेश्वर इथे 12.5 सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी 32.5 अंश सेल्सिअस तापमान नोंद करण्यात आले आहे.

जवाद चक्रीवादळ ओसरले
बंगालच्या उपसागरातील जवाद चक्रीवादळाची तीव्रता ओसरली आहे रविवारी दिनांक 5 रोजी या वादळी प्रणालीचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम बंगालच्या किनारपट्टी कडे जाताना आणखी निवळून जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.