हॅलो कृषी ऑनलाईन: लक्ष्मीकांत हिबरे या शेतकर्याने (Farmer Success Story) नापीक जमिनीत हळदीचे आंतरपीक (Turmeric Intercropping) घेऊन, नाविन्यपूर्ण लागवड पद्धती, आणि विपणन याच्या जोरावर लाखोंची कमाई केली.
कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील हागारगा गावातील 42 वर्षीय शेतकरी लक्ष्मीकांत हिबरे यांनी 12 वर्षांपूर्वी नापीक जमिनीचे (Infertile Land) हिरव्यागार शेतात रूपांतर केले. आज ते 3.5 एकर शेतजमिनीवर नैसर्गिक पद्धतीने मिश्र पीक (Mixed Crop) म्हणून हळदीची लागवड (Turmeric Cultivation) करून लाखोंची कमाई करतात (Farmer Success Story).
कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाने हिबरे यांनी 29,000 रूपयांना 600 किलो सेलम जातीच्या हळदीची (Selam Haldi) रोपे खरेदी करून आपला प्रवास सुरू केला. सेंद्रिय खते (Organic Fertilizers) आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून, त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली, मे 2021 मध्ये रोपांची काळजीपूर्वक लागवड केली (8 फूट ओळीतील अंतर आणि 1.5 फूट बियाण्यातील अंतर ठेवले) – यातून त्यांना दर्जेदार रोपे मिळाली. हिबरे यांनी केलेले कष्ट तेव्हा सार्थ ठरले जेव्हा त्यांची उच्च दर्ज्याची रोपे प्रति किलो 30 रुपये दराने विकली गेली (Farmer Success Story).
कार्यक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने हळदीची लागवड (Farmer Success Story)
हिबरे त्यांच्या हळदीच्या पिकांना (Turmeric Crop) दर आठवड्याला ठिबक सिंचनाने (Drip Irrigation) पाणी देतात, रोगांपासून पीक संरक्षण (Crop Protection) करण्यासाठी कडुनिंबाचे तेल आणि ट्रायकोडर्मा वापरतात. यामुळे हळदीची रोपे जोमाने वाढतात, शिवाय रोपांना आवश्यक सूक्ष्म पोषक घटक सुद्धा मिळतात. 10 महिन्यांनंतरच, लक्ष्मीकांतने त्यांचे पहिले पीक काढले, ज्यातून त्यांना 1.5 टन उत्पादन मिळाले (Farmer Success Story). आता त्यांचे दुसरे पीक अवघ्या एक महिन्याचे आहे.
लक्ष्मीकांतच्या हळदीच्या गुणवत्तेची भारत सरकारच्या प्रयोग शाळेने सुद्धा चाचणी केली आहे आणि त्यात कर्क्यूमिनचे (Turmeric Curcumin) जास्त म्हणजेच 3.66% प्रमाण आढळून आले. त्यांच्या अद्वितीय लागवड पद्धतीत चंदनाचा समावेश केल्याने हे परिणाम दिसून येत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे त्यांची हळद कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी सहाय्यक ठरते. हळदीच्या तुकड्याची स्वच्छता आणि वर्गीकरण करून ते हळदीपासून पावडर तयार करतात. कलबुर्गीमध्ये लक्ष्मीकांत यांची हळद पावडर (Turmeric Powder) ‘हिबारे’ या ब्रँड नावाने प्रसिद्ध आहे (Farmer Success Story).
हळद उद्योजकतेपासून कृषी-वनीकरण
लक्ष्मीकांत हिबरे यांनी मोठ्या शहरांमध्ये व्हॉट्स ॲपद्वारे त्यांच्या हळदीच्या पावडरच्या घाऊक विक्रीची व्यवस्था केली आहे. 250 ग्रॅमसाठी 100 रुपये, 500 ग्रॅमसाठी 200 रुपये आणि एक किलोग्रॅमसाठी 400 रुपये दर ठरवून त्यांनी 2 लाख रूपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवून 700 किलोग्रॅम हळद पावडर तयार केले आहेत. त्यांच्या या यशामुळे कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांकडून त्यांचे कौतुक झाले आहे.
शेती व्यवसायाव्यतिरिक्त, लक्ष्मीकांत 12 वर्षांपासून कृषी-वनीकरण सुद्धा करत आहेत, त्यांच्या जमिनीवर ते सुमारे 3875 विविध वनस्पती आणि झाडांची लागवड करत आहेत.
त्यांच्या कार्यासाठी त्यांना कृषी पंडित पुरस्कार सोबतच विविध बँका, वर्तमानपत्रे, मंच आणि संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे (Farmer Success Story).
लक्ष्मीकांत हे हळदीचे प्राचीन उपयोग आणि आरोग्य विषयक फायदे समजावून सांगताना म्हणतात की हळद ही सौंदर्यप्रसाधने, औषधे, धार्मिक प्रथा यात तर वापरली जाते, शिवाय कर्करोगासारख्या रोगांविरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. हळदीच्या अनेक फायद्यांसाठी त्याची लागवड लोकप्रिय करण्यावर त्यांचा भर आहे.