शेतकऱ्यांनो काढणी केलेला माल ठेवा सुरक्षित ; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनने गुरुवारी दिनांक 14 रोजी महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे यातच पावसाला पोषाख हवामान झाला ना विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आज दिनांक 16 रोजी विधानसभा पावसाची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यातल्या काही भागात सोयाबीनची काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली आहे. काढणी झालेला माल सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओरिसाच्या किनार्‍यालगत आहे. ही प्रणाली उद्या दिनांक 17 रोजी निवळणार असून त्याच्या प्रभावामुळे वाहणारे चक्राकार वारे उत्तर भारतातील राज्यांकडे सरकणार आहे. या प्रणालीमुळे पूर्व भारत विदर्भासह मध्य भारत आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनार्‍यालगत हवेचे आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र असून त्याच्या प्रभावामुळे केरळ कर्नाटक केरळ दक्षिण भारत राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक ,मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात विजांसहित पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काढणीचे पीक ठेवा सुरक्षित

यंदाच्या खरीप हंगामात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका सोयाबीन, कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या काही भागात सोयाबीनची काढणी सुरु आहे तर काही भागात सोयाबीनची काढणी पूर्ण झालेली आहे. पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.