Fenugreek Cultivation : मेथीच्या ‘या’ वाणांची लागवड करा; अल्पावधीत मिळेल भरघोस नफा!

Fenugreek Cultivation Seeds
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीमध्ये (Fenugreek Cultivation) अनेक बदल केले आहेत. विशेष म्हणजे शेतकरी सध्या पारंपारिक पिकांसोबतच बागायती पिकांच्या लागवडीलाही मोठी चालना देत आहेत. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात धान्य पिकांसह अनेक भाजीपाला पिकांची शेती करून चांगला नफा मिळवतात. मॉन्सूनच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या अनेक शेतकरी पहिल्या पावसावर आपल्याकडील उपलब्ध पाण्यात मेथीच्या भाजीची लागवड करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण मेथी लागवडीबाबत (Fenugreek Cultivation) अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

मेथीचे सुधारित वाण (Fenugreek Cultivation Seeds)

पुसा कसुरी, RTM-305, राजेंद्र क्रांती AFG-2 आणि हिसार सोनाली हे भारतातील मेथीच्या शीर्ष वाणांपैकी एक आहेत. शेतकऱ्यांना हवे असल्यास, हिस्सार सुवर्णा, हिस्सार मढवी, हिस्सार मुक्ता, एएफसी-१, आरटीएम-१४३, पुसा अर्ली बंचिंग, लॅम सिलेक्शन इत्यादी वाणांसह शेतकरी लागवड करू शकतात.

महत्वाचे म्हणजे मेथी पिकामध्येही कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बियाण्यांवर प्रक्रिया करणे योग्य ठरते. यासाठी मेथी दाणे 8 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवा आणि 4 ग्रॅम थायरम, 50% कार्बेन्डाझिम किंवा गोमूत्र वापरून सेंद्रिय बीज प्रक्रिया करून रासायनिक प्रक्रिया करता येते. बीजप्रक्रिया केल्यानंतर 8 तासांनी मेथीचे दाणे शेतात लावा.

मेथीचे उत्पादन

हिरव्या भाज्या किंवा पानांसाठी मेथी पेरल्यानंतर पीक 30 दिवसांत काढणीसाठी तयार होते. त्यानंतर दर 15 दिवसांनी हिरव्या भाज्यांचे दाट उत्पादन घेऊ शकते. मेथीची सेंद्रिय शेती करून तुम्ही प्रति हेक्टरी 70 ते 80 क्विंटल उत्पादन मिळवू शकता. मेथीची सुकी पानेही बाजारात 100 रुपये किलोने विकली जातात. त्याच वेळी, त्याच्या हिरव्या भाज्यांची किंमत देखील 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आहे. मेथी लागवडीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपये आणि मेथीचे सहपीक केल्यास कमी वेळेत व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकतात.