राज्यात पुढील चार दिवसांसाठी कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी असल्याने कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या चार-पाच दिवसात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक स्थिर स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

कोकणात असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकले आहे. या भागात चक्रीय स्थिती असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच मान्सूनचा ट्रॅक बिकानेर अजमेर परिसरात असून या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र मध्यप्रदेश परिसर इथं जमशेदपूर ते त्रिपुरा या दरम्यान आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भाग आणि परिसरात हे येत्या बुधवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्रात बाष्पक घेतला जाण्याचा अंदाज आहे. आपल्या राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याकडून अलर्ट जारी

— दिनांक 26 जुलै रोजी पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याच्या विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
–येत्या 27 जुलै रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केलाय.
–28 जुलै रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे
–29 जुलै रोजी पुणे, सातारा, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागाला यलो अलर्ट जारी केला आहे तर रायगड आणि रत्नागिरी या भागाला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.