हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशात यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Flood Relief Fund) बहुतेक राज्यात खरीप पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम (Kharif Crops) वाया गेला. परंतु केंद्र सरकारने (Central Government) अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या 14 राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 5,858.60 कोटी रुपये आर्थिक साहाय्य़ जारी केले आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळालेला आहे. यावर्षी 21 राज्यांना 14,958 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राला (Maharashtra) सर्वाधिक 1492 कोटी रुपये निधी (Flood Relief Fund) जाहीर करण्यात आलेला आहे.
तसेच आंध्र प्रदेशला 1036 कोटी रुपये, आसामला 716 कोटी रुपये, बिहारला 655.60 कोटी रुपये, गुजरातला 600 कोटी रुपये, हिमाचल प्रदेशला 189.20 कोटी रुपये, केरळला 145.60 कोटी रुपये आणि मणिपूर 50 कोटी रुपयांचा समावेश आहे.
मिझोरामला 21.60 कोटी रुपये, नागालँडला 19.20 कोटी रुपये, सिक्कीमला 23.60 कोटी रुपये, तेलंगणाला 416.80 कोटी रुपये, त्रिपुराला 25 कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला 468 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Flood Relief Fund). ही सर्व राज्ये पूरग्रस्त आहेत.
महाराष्ट्राला मिळालेल्या मदतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आभार मानताना पोस्ट केली आहे की, “पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या 14 राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या मदतीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी मिळाला आहे, याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री श्री. अमित शाह (Home Minister Amit Shah) यांचे आभार मानतो.
महाराष्ट्राने केंद्राकडे काही मागितले की ते त्वरित मिळते, याचा पुन्हा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1,492 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत (Flood Relief Fund) जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले आहे”.