हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आले लागवडीकडे (Ginger Farming) वळत आहेत. आल्याला बाजारात नेहमीच मागणी असल्याने त्याला दरही चांगला मिळतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना आल्याचे शेतीतून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात असते. मात्र, देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आले उत्पादन होते? देशातील आले उत्पादन घेणारी प्रमुख पाच राज्य कोणती? या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? याशिवाय प्रमुख पाच राज्यांमध्ये देशातील एकूण किती आले उत्पादन (Ginger Farming) होते? याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मध्यप्रदेश प्रथम स्थानी (Ginger Farming Top 6 States In India)
आले म्हटले चहापासून स्वयंपाक घरातील अनेक गोष्टींसाठी आल्याचा वापर होतो. ज्यामुळे गृहिणींकडून आल्याला मोठी मागणी असते. देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात आले उत्पादन (Ginger Farming) होते. दरम्यान, देशातील एकूण आले उत्पादनामध्ये मध्य प्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. देशातील एकूण आले उत्पादनापैकी मध्यप्रदेशातील शेतकरी विक्रमी 31.18 टक्के आले उत्पादन घेतात. मध्यप्रदेशातील माती आणि हवामान हे आल्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते.
अनेक आयुर्वेदिक गुणधर्म
आल्याची शेती (Ginger Farming) ही व्यावसायिक शेती म्हणून केली जाते. आले हे भाजीसह लोणच्यासाठी वापरले जाते. आल्याचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म देखील आहेत. देशातील एकूण आले उत्पादनामध्ये कर्नाटक या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. देशातील एकूण आले उत्पादनापैकी कर्नाटकात एकूण 13.80 टक्के आल्याचे उत्पादन होते. याशिवाय देशातील आले उत्पादनापैकी 7.69 टक्के उत्पादन घेत, आसाम हे राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्राचा क्रमांक चौथा
दरम्यान, आले हे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. देशातील एकूण आले उत्पादनात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील शेतकरी देशातील एकूण आले उत्पादनापैकी 7.40 टक्के उत्पादन घेतात. तर 6.09 टक्के उत्पादनासह पश्चिम बंगाल या राज्याचा देशात आले उत्पादनात पाचवा क्रमांक लागतो. तर 5.77 टक्के उत्पादनासह ओरिसा हे राज्य देशात आले उत्पादनात सहाव्या स्थानी आहे. अर्थात वरील सहा राज्य मिळून देशातील एकूण 70 टक्के आल्याचे उत्पादन घेतात.