Goat Breeds : अंगोरा प्रजातीची शेळी पाळा; दूध, मांस उत्पादनासह लोकरीतून होईल भरभराट!

Angora Goat Breeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात शेळीपालन व्यवसाय (Goat Breeds) मोठ्या प्रमाणात विस्ताराला आहे. प्रामुख्याने आपल्याकडे शेळीपालन व्यवसाय हा दुग्ध उत्पादन, मांस उत्पादन असे दोन प्रमुख उद्देश ठेऊन केला जातो. मात्र, जगभरात अशाही काही शेळ्यांच्या जाती आहेत, ज्या या दोन्ही उद्देश सध्या करण्यासोबतच लोकरच्या माध्यमातून विणकाम उद्योगासाठी देखील महत्वपूर्ण मानल्या जातात. आज आपण अशाच शेळीच्या जातीबद्दल जाणून घेणार आहोत. जिच्या शरीरावरील केसांना लोकर विणकाम उद्योगामध्ये (Goat Breeds) अनन्यसाधारण महत्व आहे.

कोणते आहे मूळस्थान? (Angora Goat Breeds For Farmers)

शेळीची अंगोरा किंवा अंकारा शेळीची तुर्किश जात (Goat Breeds) आहे. तिचे मूळस्थान तुर्कस्तान असून, ही शेळीची जात दिसण्याबाबत काहीशी मेंढीशी साध्यर्म साधते. या शेळीच्या केसांपासून ‘मोहेर’ म्हणून ओळखले जाणारे चमकदार फायबर तयार करते. थोडक्यात मोहेर म्हणजे शेळीच्या केसांपासून तयार होणारे रेशम होय. जे कापड निर्मिती आणि गरम कपड्यांची निर्मितीसाठी खूप प्रभावी मानले जाते. भारतात प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये या प्रजातीच्या शेळ्या आढळून येतात.

तीनही मार्गाने आर्थिक फायदा

अंगोरा प्रजातीची शेळीचे आयुर्मान हे जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त असते. इतर शेळ्यांच्या तुलनेत या प्रजातीची शेळी (Goat Breeds) ही प्रजननक्षम नसते. अर्थात ही शेळी सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळी एकाच करडाला जन्म देण्यास सक्षम असते. अर्थात मांस उत्पादनासाठी त्यामुळे फटका बसतो. मात्र, अंगोरा प्रजातीची केस हे साधारणपणे मेंढीप्रमाणे वर्षातून दोनदा कातरले जातात. यात एकदा प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये तर दुसर्यांदा शरद ऋतूमध्ये लोकर मिळते. अर्थात दुधासह मांस उत्पादन आणि लोकर उत्पादनामुळे या शेळीचे पालन करणे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी मिळवून देणारे ठरते.

काय आहेत ‘या’ शेळीची वैशिष्ट्ये?

अंगोरा सामान्यतः इतर पाळीव शेळ्या आणि मेंढ्यांपेक्षा आकाराने लहान असते. या शेळीची दोन्ही शिंगे डोक्यावर वळलेली असतात. तर कान लांब आणि झुकलेले आहेत. तर या प्रजातीच्या शरीरावरील केस हे मजबूत, लवचिक फायबरसारखे असतात. मुख्यतः त्याच्या गुळगुळीतपणा आणि चमकदारपणामुळे ते इतर शेळ्या मेंढ्यापेक्षा महागडे आणि वेगळे ठरते.