Goat Breeds : ‘बीटल शेळी’ बंदिस्त शेळीपालनासाठी आहे उत्तम पर्याय; वाचा… वैशिष्ट्ये?

0
4
Goat Breeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय (Goat Breeds) असून, कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. ज्यामुळे सध्या अनेक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करताना दिसून येत आहे. शेळयांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाय, म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये 10 शेळ्या पाळल्या जाऊ शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आता तुम्हीही शेळीपालन करण्याचा विचार करत असाल तर शेळीची योग्य जात निवडणे खूप आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘बीटल शेळी’ या शेळीच्या प्रजातीबद्दल (Goat Breeds) माहिती जाणून घेणार आहोत.

बीटल शेळीबद्दल थोडक्यात… (Goat Breeds For Farmers)

बीटल शेळी ही भारतातील पंजाब प्रांतातील एक जात आहे. शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये दूध आणि मांस उत्पादनासाठी या प्रजातीची शेळी (Goat Breeds) पाळली जाते. शेळीची जात जमनापारी शेळी आणि मलबारी शेळी यांसारखी असते. या शेळीला ‘लाहोरी बकरी’ असेही म्हणतात. मोठ्या शरीराच्या आकारासह ते चांगले दूध काढणारे मानले जाते. कान सपाट लांब कुरळे आणि झुकलेले असतात. या शेळ्यांची कातडी उच्च दर्जाची मानली जाते. संपूर्ण भारतीय उपखंडात स्थानिक शेळ्यांच्या सुधारणेसाठी बीटल शेळ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या शेळ्या स्टॉल फीडिंगसाठी देखील अनुकूल आहेत, त्यामुळे सघन शेळीपालनासाठी प्राधान्य दिले जाते.

बीटल शेळीची वैशिष्ट्ये?

  • या शेळीचे मुळस्थान पंजाबमधील गुरुदास हे आहे.
  • ही शेळी दुधासाठी चांगली मानली जाते.
  • या शेळ्या आकाराने मोठ्या असतात.
  • यांचा रंग काळा असून अंगावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात.
  • कान लांब लटकलेले असतात आणि आत वाकलेले असतात.
  • मादीचे वजन 40 ते 50 किलो व नराचे वजन 50 ते 80 किलो असते.
  • एका वेतातील दूध उत्पादन 5 ते 7 लिटरपर्यंत जाते.
  • ही शेळी बंदिस्त पद्धतीसाठी योग्य आहे.

कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?

राज्यासह देशभरात शेळ्यांच्या अनेक वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या हवामानात व प्रदेशात आहेत. साधारणपणे, गवताळ प्रदेशातील शेळ्या मोठ्या आकाराच्या व वजनाच्या असतात. आपल्या देशाचा विचार करता देशाच्या भौतिक रनचेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी विषम हवामान आढळते. हवामानानुसार त्या भागात वेगळे अस्तित्व असणाऱ्या जातीची जडणघडण झाली आहे.