Goat Breeds : शेळीपालनासाठी ‘काठेवाडी शेळी’ ठरतेय फायदेशीर; वाचा… कुठे मिळते?

Goat Breeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी वर्ग शेळीपालन (Goat Breeds) करत असतो. जे की शेळीपालन करण्यास खर्च ही कमी येतो तसेच जागा ही कमी लागते. विशेष म्हणजे एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये जवळपास दहा शेळ्या जगवल्या जाऊ शकतात. मात्र, शेळीपालन म्हटले की अनेक प्रकारच्या शेळ्या येतात, जसे की बिटल शेळी, शिरोही, उस्मानाबादी, तोतापुरी, देशी शेळी असे अनेक प्रकार आहेत. पण तुम्ही कधी काठेवाडी शेळीबद्धल ऐकले आहे का? आज आपण काठेवाडी शेळी, शेळीपालनासाठी (Goat Breeds) कशी फायदेशीर ठरणार आहे? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

काठेवाडी शेळीची वैशिष्ट्ये (Goat Breeds For Farmers)

आपणास काठेवाडी जातीची शेळी (Goat Breeds) जर पाळायची असेल तर ती तुम्ही आठ ते दहा वर्षाची घेऊन फायदा नाही. कारण या जातीचे निम्मे आयुष्य बंदिस्त गोठ्यामध्येच जाते. जे की तिथून पुढे जर तुम्ही ती शेळी बंदिस्त गोठ्यात ठेवली तर त्याचे आरोग्य बिघडते. कारण काठेवाडी शेळी ही दिवसाला दोन ते अडीच लिटर दुध देते. जर तुम्हाला शेळीपासून जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर काठेवाडी शेळीची जात सर्वोत्कृष्ट आहे.

किती देते दूध?

काठेवाडी जातीची शेळी दिवसाला दोन ते अडीच लिटरपेक्षा जास्त दूध देते. त्यामुळे त्या दुधातून सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. तसेच शेळीपालन लोकांना वाटते की लवकर करडे मोठी व्हावीत. तसेच जास्त किमतीला विकली जावीत तर यासाठी तुम्ही काठेवाडी शेळीची जात बिनधास्तपणे निवडू शकतात.

काठेवाडी शेळीची काय असते अडचण

बिटल शेळी, उस्मानाबादी जातीची शेळी, शिरोही जातीची शेळी, तोतापुरी जातीची शेळी आणि देशी शेळी अशा अनेक जातींच्या शेळीच्या अंगावर कमी प्रमाणत केस असतात. मात्र, काठेवाडी जातीच्या शेळीच्या अंगावर खूप केस असतात. अर्थात काठेवाडी शेळी ही केसाळू शेळी असते त्यामुळे लोकांना या केसांचे काय करायचे ही अडचण वाटते. पण या केसांमुळे आपणास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. जसे जसे केस वाढतील तसे तसे मेंढीप्रमाणे ते तुम्ही ट्रीम करू शकतात.

कुठून कराल खरेदी?

तुम्हाला जर काठेवाडी जातीची शेळी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला जावे लागेल. त्या ठिकाणी शेळ्यांचा आठवड्यातून एक दिवस आठवडे बाजार भरतो. याव्यतिरिक्त भुसावळ तसेच गुजरातमधील भावनगर येथे देखील मोठ्या प्रमाणात काठेवाडी शेळी पाहायला मिळते. या गावामधून तुम्ही काठेवाडी शेळी खरेदी करू शकतात.