Goat Farming : शेळ्यांच्या ‘या’ जाती माहितीये? मांस व दूध उत्पादनासाठी आहेत फायदेशीर!

Goat Farming Breeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेळीला गरीबाची गाय मानले जाते. कारण कमी खर्चात शेळ्यांचे संगोपन (Goat Farming) करता येते. शेळीपालनातून दुध आणि मांस असे दुहेरी उत्पादन मिळते. परिणामी सध्या पशुपालकांचा कल छोट्या जनावरांच्या पालनाकडे जास्त वळताना दिसत आहे. कारण छोट्या पशूंना पाळण्यासाठी खर्च कमी येतो. परंतु नफा जास्त होण्याची शक्यता अधिक असते. शेळीपालनासाठी फायदेशिर शेळ्यांची निवड करणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीपालनासाठीच्या प्रमुख तीन जातींची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांच्या पालनातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा (Goat Farming) होऊ शकतो.

‘या’ आहेत शेळ्यांच्या तीन प्रजाती (Goat Farming Breeds For Farmers)

गूजरी शेळी : राजस्थानातील अजमेर, टोंक, जयपूर, सीकर आणि नागौर जिल्ह्यातील काही भागात गूजरी शेळीचे संगोपन केले जाते. गूजरी बकऱ्याचा आकार इतर शेळ्यांपेक्षा मोठा असतो. या जातीच्या शेळ्यांचे दूध उच्च प्रतीचे असून, त्यांची दूध उत्पादन क्षमताही जास्त आहे. तसेच या जातीच्या शेळ्यांपासून मांसही जास्त प्रमाणात मिळते.

सोजत शेळी : शेळ्यांच्या प्रगत जातींच्या यादीत दुसरे नाव आहे सोजत शेळीचे. सोजत शेळी नागौर, जैसलमेर, पाली आणि जोधपूर जिल्ह्यांची ओळख मानली जाते. सोजत शेळ्या दिसायला खूप सुंदर असतात. दूध उत्पादन जास्त होत नसले तरी त्याच्या मांसाला बाजारात चांगला भाव मिळतो.

करौली शेळी : करौली ही जात राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील मंद्रेल, हिंडौन, सापोत्रा इ. ठिकाणी आढळते. करौली जातीच्या शेळ्या दूध आणि मांसाचा चांगला स्रोत मानल्या जातात. करौली जातीच्या शेळ्यांचे संगोपन राजस्थानातील मीना समाजात जास्त आढळते.

शेळीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. शेळीचे दूध हृदय आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे. शेळीचे दूध आहारात घेतल्यामुळे हाडे मजबूत राहतात, पचन सुधारते, म्हणूनच बाजारात शेळीच्या दुधाची मागणीही खूप जास्त असते. परिणामी दूध उत्पादनासह मांस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना या जातीच्या शेळ्या महत्वपूर्ण ठरणार आहेत.