विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा धुडगूस ; फळबागांसहित रब्बीचे नुकसान , आज ‘या’ भागात पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये गारपीट आणि वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळबागांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता पैठण, गंगापूर, तसेच वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली आहे. तर परभणी, नांदेड, हिंगोली सह काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे.

राज्यातील पंधरा जिल्ह्यात गारपीट
मंगळवारी विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा, नागपूर, अमरावती, वर्धा ,भंडारा, गोंदिया, यवतमाळ तर मराठवाड्यातील पाच जिल्हे तसेच अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपीट याचा मोठा तडाखा बसला. विदर्भात वीज कोसळून तिघे जण ठार झाले तर दाट धुक्यामुळे नागपूर विमानतळावरील सर्व उड्डाणात तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

आजही ‘या’ भागात होणार पाऊस
हवामान तज्ञ के .एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्र मध्ये तापमान पुन्हा एकदा घसरण्याची शक्यता आहे. तसेच हाच ट्रेंड उद्याही कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज म्हणजेच दिनांक 29 रोजी देखील वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज देखील वेगवान वारे ,गारपीटसहीत , पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात वीज आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ दोन दिवस कायम राहणार असून त्यानंतर थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या किमान तापमानात काल बऱ्याच भागांमध्ये दोन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचा हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. तर वेस्टन डिस्टर्बन्स च्या प्रभावामुळे 29 आणि 30 डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे . तसेच मध्य भारतात दोन दिवसांनी काही ठिकाणी किमान तापमान दोन ते चार अंश सेल्सिअस न घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.