हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला दिसतो आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भात तापमान ४४ अंशांपर्यंत पोहचले आहे. दिनांक १८ एप्रिल रोजी अकोला , चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी या भागात सर्वाधिक कमाल ४४. २ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर भारतीय हवामान विभागाच्या नागपूर शाखेने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज चंद्र्पुर आणि अकोला या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट नागपूर हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होत असून पावसाला पोषक हवामान होत आहे. हवामान तज्ञ् के. एस . होसाळीकर यांनी ट्विटर द्वारे दिलेल्या माहितीनुसार दिनांक 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
21 एप्रिल – दिनांक 21 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला ,अमरावती ,नागपूर, वर्धा ,यवतमाळ ,चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा ,गडचिरोली ,नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे
22 एप्रिल– तर दिनांक 22 एप्रिल रोजी अहमदनगर पुणे, सातारा ,सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया आणि भंडारा या भागाला पाऊस पडण्याचा अंदाज आहेत या भागाला हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान
दिनांक 18 एप्रिल रोजी नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढील प्रमाणे : नांदेड 41 पॉइंट 6, बीड 42, अकोला 44.2, अमरावती 42.5, बुलढाणा 41.3, ब्रम्हपुरी 44.2, चंद्रपूर 44.2, गोंदिया 42, नागपूर 42.6, वाशिम 42.5 आणि वर्धा 43 पॉईंट आठ, पुणे 38.8, लोहगाव 39.6, कोल्हापूर 36.1, महाबळेश्वर 31. 6, नाशिक 37.5, सांगली 37.4, सोलापूर 42 ,अंश सेल्सिअस मुंबई 33.4