पुण्यासह राज्यातल्या अनेक भागांना वादळी पावसाने झोडपले ; आज ‘या’ भागात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

windy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकण ,सातारा ,पुण्यासह राज्यातल्या अनेक भागात काल दिनांक २२ एप्रिल रोजी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक पुणे ,सातारा भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे कामावरून परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मध्य प्रदेशपासून तेलंगणापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. मात्र राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देन्यात आला असून या भागात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील कमाल तापमान (दि . २२ एप्रिल २०२२)

पुणे ३७.६, नगर ३८.२, धुळे ३८, जळगाव ४०, कोल्हापूर ३९.१, महाबळेश्‍वर ३१.३, नाशिक ३६, निफाड ३९.६, सांगली ४०.२, सातारा ३८.९, सोलापूर ४२.२, सांताक्रूझ ३८.९, डहाणू ३७.२, रत्नागिरी ३५.७, औरंगाबाद ३८.१, नांदेड ४१.४, परभणी ४१.४, अकोला ४२.६, अमरावती ४२.६, बुलडाणा ३८, ब्रह्मपुरी ४४, चंद्रपूर ४५.४, गोंदिया ४३.२, नागपूर ४२.४, वर्धा ४३.८, वाशीम ४३, यवतमाळ ४३.